भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा बाबतीत असे म्हणले जाते की, तो विसरभोळा आहे. एखादी गोष्ट जास्त काळ त्याच्या लक्षात राहत नाही. यामुळेच संघातील इतर खेळाडू त्याची थट्टा देखील करतात. आत्ताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तो व्हिडिओ पाहून चाहत्यांचे असे म्हणणे आहे की, रोहित शर्माची स्मरणशक्ती आश्चर्यकारक आहे. तोच व्हिडिओ भारतीय संघाने सोशल मीडिया अकाउंट वरती प्रसारित केला आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीलाच रवींद्र जडेजा आणि रोहित शर्मा दिसतात, यानंतर दोघांमध्ये चर्चा सुरू होते. बोलता बोलता विषय निघतो तो की ते किती आयसीसी मीडिया डे गेले आहेत?
रवींद्र जडेजाने विचारलेल्या प्रश्नावरती रोहित शर्मा म्हणतो की, त्याने 9 टी20 वर्ल्ड कप सोबतच 3 वनडे वर्ल्ड कप, 2 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2 डब्लूटीसी आणि आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी मिळून एकूण 17 वेळा आयसीसीच्या मीडिया डे साठी गेला आहे. रोहित शर्माने दिलेल्या उत्तरानंतर रवींद्र जडेजा सांगतो की त्याने कोणकोणते आयसीसी इव्हेंट खेळले नाहीत. या व्हिडिओ वरती चाहते भरघोस प्रतिक्रिया देत आहेत.
भारतीय संघाचे सामने दुबई मध्ये खेळले जाणार आहेत. या स्पर्धेची सुरुवात (19 फेब्रुवारी) पासून होणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना बांग्लादेश सोबत (20 फेब्रुवारी) रोजी होणार आहे. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ न्युझीलंड आणि पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार अटीतटीचा, पण कोण बाजी मारणार?
IND vs BAN: बांगलादेशविरुद्ध या खेळाडूने मारलेत सर्वाधिक षटकार, दुसरा जवळपासही नाही
Champions Trophy; अर्शदीप सिंग की हर्षित राणा कोणाला मिळणार संधी? मोठी अपडेट समोर