यंदाच्या आयपीएल हंगामातील (IPL 2025) 37वा सामना राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध पंजाब किंग्ज (RCB vs PBKS) संघात खेळला जाणार आहे. दरम्यान रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबी आणि श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब संघ चंदीगढच्या मैदानावर आमने-सामने आहेत. या सामन्याचा टाॅस जिंकून आरसीबीने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पंजाबचा संघ फलंदाजी करताना दिसेल.
शेवटच्या सामन्यात दोन्ही संघ आमने-सामने होते. हा सामना बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झाला होता. या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने आरसीबीला धूळ चारली होती. आता आरसीबी आपल्या पराभवाचा बदला घेणार का? हे पाहणेदेखील उत्सुकतेचं ठरेल.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू- फिलिप सॉल्ट, विराट कोहली, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, क्रुणाल पांड्या, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, जोश हेजलवुड, यश दयाल
इम्पॅक्ट प्लेयर- देवदत्त पडिक्कल, रसिक दार सलाम, मनोज भंडागे, जेकब बेथेल, स्वप्नील सिंग
पंजाब किंग्ज- प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, मार्को जॅन्सन, झेवियर बार्टलेट, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल
इम्पॅक्ट प्लेयर- हरप्रीत ब्रार, विजयकुमार विशक, सूर्यांश शेडगे, ग्लेन मॅक्सवेल, प्रवीण दुबे
पंजाबचा संघ गुणतालिकेत 10 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाबने चमकदार कामगिरी केली आहे. तर युवा रजत पाटीदारच्या नेतृृत्वाखाली आरसीबीने 4 सामन्यात विजय मिळवले आहेत. आरसीबीचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे.