---Advertisement---

VIDEO: अनसोल्ड राहिलेला ‌‌‌‌श्रीसंत गातोय,’ रूक जाना नहीं तू कभी हार के’

sreeshant
---Advertisement---

आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव (IPL 2022 Mega auction) १२ आणि १३ फेब्रुवारीला बेंगलोर येथे पार पडला. या लिलावात १० फ्रॅंचायझींनी आपला संघ मजबुत करण्याच्या दृष्टीने ५९० खेळाडूंवर बोली लावली. या लिलावात सुरेश रैनासारख्या अनेक दिग्गज खेळाडूंवर बोली लागली नाही तर इशान किशनसारख्या अनेक खेळाडूंवर मोठी बोली लागली. भारताचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंत(S Sreesanth) याला सुद्धा लिलावात खरेदीदार मिळाला नाही. यानंतर त्याने ट्वीट करत एक हिंदी गाणे गात आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत .

केरळचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंत याची मुळ किंमत ५० लाख रुपये एवढी होती. विशेष बाब म्हणजे लिलावादरम्यान त्याचे नाव सुद्धा घेतले गेले नाही. त्याचा अंतिम ५९० खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला होता. त्याचे नाव शॉर्टलिस्ट केले गेलेले असूनही लिलावाच्या प्रक्रियेत त्याचे नाव पोहचू शकले नाही. स्पॉट फिक्सिंगमध्ये नाव आल्यामुळे श्रीसंतवर बीसीसीआयने ७ वर्षांची बंदी घातली गेली होती. यानंतर या वेगवान गोलंदाजाने आयपीएल २०२२ च्या मेगा ऑक्शनमध्ये सहभागी होण्यासाठी आपले नाव दिले होते.

आपली खरेदी न होण्यावर श्रीसंतने कठोर परिश्रम करत राहणार असल्याच सांगितले आहे. त्याने त्याच्या अधिकृत ट्वीटर आकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये ‘रुक जाना नही तु कही हार के’ हे हिंदी गाणे गाताना तो दिसत आहे. या गाण्यातून कदाचीत हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की, त्याने हार मानली नाही. तो पुढे देखील असेच प्रयत्न करत राहणार. त्याने शेअर केलेल्या व्हिडीओला कॅप्शन दिले आहे की, ‘नेहमी आभार आणि नेहमी पुढे पाहतो, तुम्हा प्रत्येकाला खूप प्रेम आणि आदर, ओम नम: शिवाय.’

आयपीएल लिलावामध्ये ११ खेळाडूंवर १० कोटींवरुन अधिक बोली लागली आहे. त्यामध्ये सर्वाधिक बोली इशान किशनवर लागली. मुंबई इंडीयन्स संघाने १५.२५ कोटी रुपयांना त्याला खरेदी केले. आयपीएल २०२२ मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खेळवली जाण्याची शक्यता आहे. सर्व संघांनी उत्तम खेळाडू निवडले असले तरी मैदानात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या-

डू प्लेसिस, कोहली, मॅक्सवेल; कोण होईल आरसीबीचा भावी कर्णधार? माइक हेसनने केला खुलासा (mahasports.in)

अनसोल्ड गेलेल्या अमित मिश्रासाठी दिल्ली कॅपिटल्सच्या संघमालकाची भावूक पोस्ट; लिहीले… (mahasports.in)

प्रेमासाठी काहीपण! भारताचा ‘जंबो’ गोलंदाज कुंबळेने प्रेमासाठी दिली होती न्यायालयीन लढाई (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---