---Advertisement---

जिथे आयुष्याला डाग लागला, तिथेच तो डाग मिटवायला येतोय परत!! लिलावातील संधीवरून श्रीसंत भावुक

S Sreesanth
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ (IPL 2022) चा हंगाम लवकरच सुरू होणार असून त्या अनुषंगाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय,BCCI) तयारीला लागले आहे. सुरुवातीला बीसीसीआयने सर्व सहभागी १० आयपीएल फ्रँचायझींना ठराविक खेळाडूंना संघात कायम करण्यास सांगितले होते. त्यानंतर आता मेगा लिलावात (Mega Auction) सहभागी होणाऱ्या अंतिम खेळाडूंची यादीही जाहीर करण्यात आली आहे. आयपीएल २०२२ लिलावासाठी तब्बल १२१४ खेळाडूंनी नाव नोंदणी केली होती. पण, ५९० खेळाडूंची लिलावासाठी अंतिम निवड करण्यात आली आहे.

या अंतिम निवड झालेल्या ५९० खेळाडूंमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंत (S Sreesanth) याचाही समावेश आहे. जवळपास ९ वर्षांनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करत असल्याने श्रीसंत खूपच आनंदात असून त्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे आपला आनंद व्यक्त केला आहे. ५० लाखांच्या मूळ किंमतीसह त्याने लिलावात आपले नाव नोंदवले आहे. 

बीसीसीआयद्वारे मेगा लिलावाच्या अंतिम यादीची घोषणा झाल्यानंतर लगेचच ३३ वर्षीय श्रीसंतने त्याच्या प्रशंसकांचे आभार व्यक्त करणारी भावूक अशी सोशल मीडिया पोस्ट केली आहे. त्याने ट्वीटरवर पोस्ट करत लिहिले आहे की, तुम्हा सर्वांना माझे खूप खूप प्रेम… मी असे तुम्हा सर्वांचे आभार मानू शकणार नाही… खूप खूप धन्यवाद. तुम्हा सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. कृपया अंतिम लिलावातही माझी निवड व्हावी म्हणून प्रार्थना करा.  

दरम्यान यापूर्वीही आयपीएल २०२१ च्या हंगामात श्रीसंतने लिलावात त्याचे नाव नोंदवले होते. परंतु तो लिलावासाठी अंतिम निवड झालेल्या खेळाडूंमध्ये जागा मिळवण्यात अपयशी ठरला होता. स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकल्यानंतर आयपीएलमधून निलंबित झालेल्या श्रीसंतने आयपीएलच्या रणांगणात न उतरून ९ वर्षे झाली आहेत. त्याने २०१३ साली शेवटचा आयपीएल सामना खेळला होता. या हंगामात तो राजस्थान रॉयल्सचा भाग होता. तत्पूर्वी त्याने पंजाब किंग्ज आणि कोच्ची टस्कर्स केरळ संघाचेही प्रतिनिधित्त्व केले आहे.

आयपीएलमधून निलंबित होण्यापूर्वी त्याने ४४ सामने खेळले असून त्यादरम्यान ४० विकेट्सही घेतल्या आहेत. परंतु गेल्या बऱ्याच वर्षांपासून क्रिकेटमैदानात न उतरलेल्या श्रीसंतवर १० पैकी कोणती फ्रँचायझी बोली लावेल, हे पाहाणे औत्सुक्याचे असेल.

महत्त्वाच्या बातम्या-

यष्टीरक्षकांच्या शोधात आहेत फ्रँचायझी, ईशान किशनसह ‘या’ विकेटकिपर्सची लिलावात होणार चांदी!

आयपीएल २०२२च्या मेगा लिलावाशी संबंधित १० मुद्दे, जे आहेत अत्यंत महत्त्वाचे

‘रोहितसेने’तून बाहेर असलेल्या अश्विनचा अनोखा प्रयोग, एका हाताने फलंदाजीचा करतोय सराव- Video

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---