नुकतीच देशांतर्गत क्रिकेटमधील प्रसिद्ध टी२० स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील एक सामना शुक्रवारी (१५ जानेवारी) मुंबई विरुद्ध हरियाणा संघात झाला. या सामन्याद्वारे भारताचा महान फलंदाज सचिन तेंडूलकर याचा मुलगा अर्जुन तेंडूलकर याचे मुंबईच्या वरिष्ठ संघाकडून ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये पदार्पण झाले आहे. यासह वरिष्ठ ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत खेळलेली सचिन आणि अर्जुन यांची पहिली भारतीय बाप-लेकांची जोडी बनली आहे.
पदार्पणाच्या सामन्यात केली ११व्या क्रमांकावर फलंदाजी
मुंबई विरुद्ध हरियाणा संघातील सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी निवडली होती आणि १९.३ षटकात १४३ धावा केल्या होत्या. यावेळी डावखुरा अष्टपैलू खेळाडू अर्जुन याने ११व्या क्रमांकावर फलंदाजी केली. सचिनविषयी बोलायचे झाले तर, त्याने ९६ सामन्यांच्या ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट कारकिर्दीत सर्वात खालील पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली होती.
आयपीएल २००९ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या एका सामन्यात तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजी उतरला होता. याव्यतिरिक्त सचिनने अधिकतर सलामीला फलंदाजी केली होती.
Sachin Tendulkar and Arjun Tendulkar today became the 1st father-son pair from India to feature in Twenty20 cricket.
Arjun (bowling all-rounder) batted at No.11 on his debut. The lowest position Sachin batted in his 96-match career was No.5 (vs RR, IPL 2009). #SyedMushtaqAliT20
— Sampath Bandarupalli (@SampathStats) January 15, 2021
पदार्पणाच्या ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यातील अर्जुनची कामगिरी
२१ वर्षीय अर्जुन हा वेगवान गोलंदाज आहे. गरजेनुसार तो फलंदाजीही करू शकतो. हरियाणाविरुद्ध झालेल्या सामन्यात अर्जुन फलंदाजीत विशेष कामगिरी करु शकला नाही. परंतु गोलंदाजी करताना त्याने हरियाणाचा सलामीवीर चैतन्य बिश्नोईची एकमेव विकेट घेतली. डावातील चौथ्या षटकात अवघ्या ४ धावांवर त्याने बिश्नोईला झेलबाद केले. हरियाणा संघाने ८ विकेट्सने हा सामना जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS Test Live : शेपूट वळवळलं; ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३६९ धावांवर संपुष्टात
AUS v IND : कसोटी मालिकेत चारही सामन्यात खेळलेल्या खेळाडूंचा होऊ शकतो ‘असा’ ११ जणांचा संघ
ब्रिस्बेन कसोटी दरम्यान मॅथ्यू वेडची स्लेजिंग करणाऱ्या रिषभ पंतवर भडकले ‘हे’ दोन ऑस्ट्रेलियन दिग्गज