सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील एक सामना शुक्रवारी (१५ जानेवारी) मुंबई विरुद्ध हरियाणा संघात झाला. या सामन्याद्वारे भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचे मुंबईच्या वरिष्ठ संघाकडून टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण झाले आहे. त्याचे नुकतेच पदर्पण झाले असले तरी वडिलांच्या कारकिर्दीशी त्याची आत्ताच तुलना होणे सुरु झाले आहे.
ट्विटरवर एका चाहत्याने अशीच एक तुलना करणारी पोस्ट लिहिली आहे. या पोस्ट मध्ये त्याने अर्जुनची आणि सचिनची २१ वर्षे वय असतानाची कामगिरी लिहिली आहे. अर्जुन २१ वर्षे आणि ११३ दिवस, असे वय असताना मुंबईकडून पदार्पण करतो आहे असे लिहित या चाहत्याने सचिनने तेच वय असताना केलेल्या कामगिरीचा उल्लेख केला आहे.
सचिनने २१ वर्षे ११३ दिवसाचा असताना भारताकडून ३२ कसोटी सामन्यात ५०.५७ च्या सरासरीने ७ शतकांसह २०२३ धावा काढल्या होत्या. तर ७६ वनडे सामन्यात ३२.९५ च्या सरासरीने १७ अर्धशतकांसह २१०९ धावा काढल्या होत्या. तसेच त्या वयात तो आयसीसीच्या जागतिक कसोटी क्रमवारीत दुसऱ्या आणि वनडे क्रमवारीत दहाव्या स्थानावर होता, असाही उल्लेख या चाहत्याने केला आहे.
Sachin Tendulkar's son Arjun made his senior debut yesterday, aged 21y 113d for Mumbai in #SyedMushtaqAliTrophy:
Sachin by same age:
32 Tests, 2023 runs, 7 100s, 50.57 avge, ranked 2
76 ODIs, 2109 runs, 17 50s, 32.95 avge, ranked 10#tendulkar— Richard V Isaacs (@RVICricketStats) January 16, 2021
पदार्पणाच्या टी-२० सामन्यातील अर्जुनची कामगिरी
२१ वर्षीय अर्जुन हा वेगवान गोलंदाज आहे. गरजेनुसार तो फलंदाजीही करू शकतो. हरियाणाविरुद्ध झालेल्या सामन्यात अर्जुन फलंदाजीत विशेष कामगिरी करु शकला नाही. परंतु गोलंदाजी करताना त्याने हरियाणाचा सलामीवीर चैतन्य बिश्नोईची एकमेव विकेट घेतली. डावातील चौथ्या षटकात अवघ्या ४ धावांवर त्याने बिश्नोईला झेलबाद केले. हरियाणा संघाने ८ विकेट्सने हा सामना जिंकला.
महत्वाच्या बातम्या:
भरतनाट्यम स्टाइलमध्ये गोलंदाजी कधी पाहिलीय का? हा व्हिडिओ जरुर पाहा
लॉयनविरुद्ध आक्रमक फटका खेळून बाद झाल्यानंतर रोहितचे स्पष्टीकरण, म्हणाला
पडद्यामागचा खरा नायक! हार्दिक-कृणालच्या वडिलांच्या त्यागाची कहाणी, वाचून व्हाल भावनिक