रविवारी (२४ ऑक्टोबर) पार पडलेल्या भारत आणि पाकिस्तान संघातील सामन्यात पाकिस्तानने दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघातील बहुतांश खेळाडूंचे प्रदर्शन खूपच खराब राहिले. विशेषत: भारतीय गोलंदाज या सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरले आणि त्यांना पाकिस्तानची एकही विकेट घेता आली नाही.
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने या सामन्यात सर्वाधित धावा दिल्या. यानंतर सोशल मीडियावरील काही लोकांनी शमीच्या प्रदर्शनाचा आणि त्याच्या धर्माचा संबंध जोडला आणि त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. अशात क्रिकेट जगतातील अनेकांनी या गोष्टीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलरकनेही या गोष्टीबाबत निराशा व्यक्त केली आणि तो शमीच्या समर्थनात असल्याचे स्पष्ट केले आहे.
सचिनने त्याच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून या गोष्टीबाबत निराशा व्यक्त केली आहे. सचिनने सोमवारी ट्वीट केले की, “जेव्हा आपण भारतीय संघाला सपोर्ट करतो, तेव्हा त्या प्रत्येक व्यक्तीला सपोर्ट करतो, जो भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतो. मोहम्मद शमी वचनबद्ध खेळाडू आहे आणि विश्वस्तरीय गोलंदाज आहे. त्याचा एक दिवस खराब गेला आणि क्रीडाजगतात कोणत्याही खेळाडूसोबत असे होऊ शकते. मी एवढेच म्हणू शकतो की, मी पूर्णपणे शमी आणि भारतीय संघासोबत उभा आहे.”
When we support #TeamIndia, we support every person who represents Team India. @MdShami11 is a committed, world-class bowler. He had an off day like any other sportsperson can have.
I stand behind Shami & Team India.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) October 25, 2021
सचिनव्यतिरिक्त क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनीही शमीच्या समर्थनार्थ एक ट्वीट केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, “जे लोक मोहम्मद शमीविषयी घाण चर्चा करत आहेत, त्यांना माझी एक विनंती आहे. तुम्ही क्रिकेट पाहू नका आणि तुमची कमतरता जाणवणारही नाही.”
Jo log Mohammad Shami ke baare mein ghatiya baaten kar rahe hain, unse meri ek hi vinanti hai. Aap cricket na dekhen. Aur aapki kami mehsoos bhi nahi hogi. #Shami #355WicketsforIndia.
— Harsha Bhogle (@bhogleharsha) October 25, 2021
दरम्यान, सामन्यात पाकिस्तानने भारताला १० विकेट्स राखून नमवले. पाकिस्तानने भारतावर मिळवलेला हा विजय आतापर्यंतच्या विश्वचषकाच्या इतिहासातील पहिलाच विजय ठरला आहे. यापूर्वी पाकिस्तान विश्वचषकात भारताविरुद्ध १२ वेळा खेळले होते आणि प्रत्येक वेळी भारताने बाजी मारली होती.
दरम्यान सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत मर्यादित २० षटकांमध्ये ७ विकेट्सच्या नुकसानावर १५१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्ताने एकही विकेट न गमावता १५२ धावांचे लक्ष्य १७.५ षटकांमध्ये गाठले आणि सामन्यात विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या –
स्कॉटलंड नाचले मुजीबच्या तालावर! पाच बळी मिळवत रचले विक्रमच विक्रम
बेन स्टोक्स परत येतोय! ‘या’ मोठ्या स्पर्धेत इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू खेळताना दिसणार