इंग्लंडचा भारत दौरा चालू असून गुरुवारपासून (२४ फेब्रुवारी) या दौऱ्यातील तिसरा कसोटी सामना चालू आहे. जगातील सर्वात मोठ्या अर्थात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुलाबी चेंडूने हा सामना खेळवला जात आहे. तत्पुर्वी चेन्नईत झालेल्या पहिल्या २ कसोटी सामन्यात खेळपट्टीमुळे बराच विवाद निर्माण झाला होता. परंतु अहमदाबाद स्टेडियमची खेळपट्टी चांगली असल्याचा दावा माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर याने केला आहे.
आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारे सचिनने यासंदर्भात ट्विट केले आहे. ‘अहमदाबाद स्टेडियम साबरमती नदीच्या जवळ आहे. त्यामुळे या स्टेडियमच्या खेळपट्टीमध्ये ओलावा असेल. परिणामत: पूर्ण ५ दिवसही खेळपट्टीचा रंग बदलणार नाही. यामुळे तुम्ही चकित होऊ नका,’ असे त्याने ट्विटमध्ये लिहिले आहे.
साधारणपणे कसोटी सामन्यात विशेष करुन भारतात प्रत्येक दिवशी खेळपट्टी रंग बदलते. खेळपट्टीत भेगा पडतात. मात्र सचिनच्या म्हणण्यानुसार अहमदाबाद स्टेडियम साबरमती नदीच्या नजीक असल्याने खेळपट्टीमध्ये ओलावा असेल. त्यामुळेच सामन्याचे पाचही दिवस खेळपट्टीचा रंग एकच असेल. या खेळपट्टीतील ओलाव्यामुळे संध्याकाळी वेगवान गोलंदाजांना याचा फायदा होऊ शकतो.
https://twitter.com/sachin_rt/status/1364557960907681795?s=20
दरम्यान सामन्याचा विचार करायचा झाल्यास, हा दिवस-रात्र सामना असून अहमदाबाद स्टेडियम वेगवान गोलंदाजांसाठी लाभदायी ठरणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय फिरकीपटूंचा दबदबा दिसून आला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या इंग्लंडला अक्षर पटेल आणि आर अश्विन या फिरकीपटूंनी ११२ धावांवर गारद केले. दरम्यान अक्षरने ६ तर अश्विनने ३ बळी मिळवले. इंग्लंडकडून सलामीवीर जॅक क्राउले सर्वाधिक ५३ धावा करू शकला.
प्रत्युत्तरात इंग्लंडच्या गोलंदाजांनी ३२.२ षटकात ९८ धावांवर भारतीय संघाला ३ धक्के दिले. तरीही सलामीवीर रोहित शर्माने नाबाद अर्धशतकी खेळी करत एका बाजूने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परिणामी पहिल्या दिवसाखेर भारतीय संघ ३ बाद ९९ धावांवर आला आहे. आघाडी घेण्यासाठी त्यांना अवघ्या १३ धावांची गरज आहे. अशात दुसऱ्या दिवशी तगडी धावसंख्या उभारत इंग्लंडला दबावात अणण्यासाठी भारत प्रयत्नशील असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
मोदींना साथ देणार दिंडा! माजी वेगवान गोलंदाज अशोक दिंडाने केला बीजेपीत प्रवेश
रूटला बाद केल्यानंतर विराटचे सेलिब्रेशन पाहिले का?, व्हिडिओ होतोय व्हायरल