टी२० विश्वचषकात रविवारी (२४ ऑक्टोबर) पाकिस्तानने भारतावर विजय मिळवला. हा पाकिस्तानचा भारतावरील कुठल्याही विश्वचषकातील पहिला विजय ठरला. पाकिस्तानने मिळवलेल्या या विजयानंतर त्यांचे माजी खेळाडू खूपच उत्सुक झालेले पाहायला मिळत आहेत. दरम्यान, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सलमान बटने वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीची थेट खिल्ली उडवली आहे.
सलमानच्या म्हणण्याप्रमाणे वरुणसारख्या गोलंदाजांना पाकिस्तानमधील लहान मुलं गल्ली क्रिकेटमध्ये रोज खेळतात. दरम्यान वरुण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात काही खास कामगिरी करू शकला नव्हता आणि याच पार्श्वभूमीवर सलमान बटनी ही टीका केली आहे.
वरुणने त्याच्या चार षटकांच्या स्पेलमध्ये एकही विकेट घेतली नाही आणि ३३ धावा दिल्या आणि संघासाठी महागात पडला. आयपीएल २०२१ मध्ये त्याने केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीप्रमाणेच तो विश्वचषकातही प्रदर्शन करेल, अशी चाहत्यांची अपेक्षा होती, पण विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात त्याने अपेक्षाभंग केला.
या सामन्यानंतर पाकिस्तानचे माजी खेळाडू सलमान बट त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलत होता. तो यावेळी म्हणाला की, “वरूण चक्रवर्ती मिस्ट्री गोलंदाज असेल, पण तो आमच्यासाठी कोणतेही सरप्राइज नव्हता. लहान मुलं पाकिस्तामध्ये खूप टॅप बॉल क्रिकेट खेळतात. पाकिस्तानमध्ये प्रत्येक लहान मूल अशाप्रकारच्या गोलंदाजीला गल्लीमध्ये खेळतं, जेथे गोलंदाज बोटांचा वापर करून अनेक प्रकारच्या विविधतेने गोलंदाजी करतो.”
“कारकिर्दीच्या सुरुवातीला श्रीलंकेच्या अजंता मेंडिसनेही त्याच्या मिस्ट्रीने फलंदाजांना चांगलेच हैराण केले होते. पण त्याचे रेकॉर्ड पाकिस्तानविरुद्ध चांगले राहिले नाही. त्यानंतर काही काळाने श्रीलंकेने त्याला भारताविरुद्ध खेळवणे बंद केले. आम्हाला कधीच कोणता गोलंदाज मिस्ट्रीसारखा नाही वाटला, कारण आम्ही अशाच गोलंदाजांसोबत खेळत म्हातारे झालो आहोत. मला नाही वाटत की, भारत आता वरुणला कधी पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरवील, जर त्यांनी तसे केले तर निकाल आजप्रमाणेच असेल,” असे सलमान पुढे बोलताना म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या –
स्कॉटलंड नाचले मुजीबच्या तालावर! पाच बळी मिळवत रचले विक्रमच विक्रम
बेन स्टोक्स परत येतोय! ‘या’ मोठ्या स्पर्धेत इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू खेळताना दिसणार