आयपीएल 2020चा हंगाम जवळ आला आहे. आयपीएलचा (IPL) हा 13वा हंगाम आहे. या हंगामासाठी गुरुवारी(19 डिसेंबर) कोलकाता येथे लिलाव पार पडला. या लिलावात इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू सॅम करनला (Sam Curran) चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) आपल्या संघात सामील केले आहे.
3 वेळच्या आयपीएल विजेत्या चेंन्नई सुपर किंग्स संघात सामील झाल्यानंतर सॅमने कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आणि प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगकडून (Stephen Fleming) बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील असे सांगितले.
या लिलावा दरम्यान चेन्नई आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघांमध्ये सॅमला विकत घेण्यासाठी चढाओढ सुरू होती. परंतु, चेन्नईने सॅमवर 5.5 कोटी रुपयांची बोली लावत आपल्या ताफ्यात घेतले आहे.
“चेन्नई संघात आल्यानंतर मी आपल्या नव्या संघसहकाऱ्यांना, कर्णधार एमएस धोनी आणि प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांना भेटण्यासाठी उत्सुक आहे. मला त्यांच्याकडून शिकण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. मला आशा आहे की आम्ही हे विजेतेपद जिंकू,” असे चेन्नईने शेअर केलेल्या व्हिडिओत सॅम म्हणाला.
Kadai Kutty Singham @CurranSM pounces straight to the point and how! #WhistlePodu #SuperFam 🦁💛 pic.twitter.com/XhfC5hKC8G
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) December 21, 2019
“मी चेन्नई संघाकडून खेळण्याची वाट पाहतोय. मागील हंगामात मी चेन्नईविरुद्ध खेळलो होतो आणि आता चेन्नईसंघाकडून खेळणार आहे. हे खूप छान असेल. आम्ही चांगले प्रदर्शन करू,” असेही सॅम यावेळी म्हणाला.
मागील हंगामात सॅम हा किंग्स इलेव्हन पंजाबचा भाग होता, त्यात त्याने एक हॅट्ट्रिक घेतली होती.
आतापर्यंत सॅमने आयपीएलचे 9 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 172.72 च्या स्ट्राईक रेटने आणि 23.75 च्या सरासरीने 95 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने अर्धशतकही केले आहे.
त्याचबरोबर, सॅमने गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली आहे. त्याने 9 सामन्यांमध्ये 32.30 च्या सरासरीने 323 धावा देत 10 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, त्याचे 4/11 असे उत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शन आहे.
गंभीर म्हणतो, हा गोलंदाज अजून तरी ८.५० कोटी रुपयांसाठी पात्र नाही
वाचा- 👉https://t.co/FZm2QHf4JI👈#म #मराठी #Cricket #IPL2020Auction @Mazi_Marathi @MarathiRT— Maha Sports (@Maha_Sports) December 21, 2019
…म्हणून सीएसकेने पीयूष चावलावर लावली ६.७५ कोटींची बोली, प्रशिक्षक फ्लेमिंगने केला खूलासा
वाचा- 👉https://t.co/aLM8daHCzz👈#म #मराठी #Cricket #IPL2020Auction @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) December 21, 2019