---Advertisement---

व्हिडिओ: धाव घेताना फलंदाजाची गोलंदाजाशी घातक टक्कर, त्यानंतर घडलं असं काही की तुम्ही कराल कौतुक

---Advertisement---

बऱ्याचदा चालू क्रिकेट सामन्यात फलंदाज खेळपट्टीवर धाव घेताना विरोधी संघाच्या खेळाडूंना धडकल्याच्या घटना आपण पाहिल्या आहेत. धडक झाल्यानंतर अधिकदा तर दोन्ही खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक किंवा मारामारीपर्यंत वाद गेल्याचे दिसून येते. परंतु बीबीएल १० मधील एका सामन्यादरम्यान याउलट दृश्य पाहायला मिळाले. ज्याने कित्येक क्रिकेट रसिकांची मने जिंकली आहेत.

रविवारी (१७ जानेवारी) बिग बॅश लीगमधील (बीबीएल) मेलबर्न स्टार्स विरुद्ध रेनेगेड्स संघात झालेल्या सामन्यादरम्यान ही घटना झाली. रेनेगेड्स संघाचा यष्टीरक्षक फलंदाज सॅम हॉर्पर फलंदाजी करत होता. अशात मेलबर्न स्टार्सचा गोलंदाज लियाम हॅचर डावातील १८ वे षटक टाकण्यासाठी आला. त्याच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर शॉट मारल्यानंतर हॉर्पर एक धाव घेण्यासाठी पळाला. हॉर्पर आपली धाव पूर्ण करत असताना दुसऱ्या बाजूने गोलंदाज लियाम चेंडू पकडण्यासाठी पळाला आणि दोघांची एकमेकांमध्ये टक्कर झाली.

या टक्करीनंतर हॉर्पर पटकन उठला आणि धाव पूर्ण करण्यासाठी पळाला. तर दुसरीकडे लियाम वेदनेने मैदानावर बसून कळवळू लागला. हे पाहून धाव अर्ध्यातच सोडत हॉर्पर लियामजवळ जाऊन त्याची विचारपूस करण्याच्या उद्देशाने त्याच्याकडे जाऊ लागला. पण अचानक त्याला आठवण आले की, आपण धाव पूर्ण न करता त्याच्याकडे गेलो तर धावबाद होऊ. त्यामुळे पटकन त्याने धाव पूर्ण केली. त्यानंतर लियामकडे जाऊन हॉर्परने त्याची क्षमा मागितली.

हे पाहून, लियामने यात आपलीही चूक असल्याचे मान्य करत हॉर्परची क्षमा मागितली. या दोन्ही खेळाडूतील खेळ भावना दर्शवणारा व्हिडिओ बिग बॅश लीगने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

मेलबर्न स्टार्सचा दणदणीत विजय 

सामन्याविषयी बोलायचे झाले तर, ग्लेन मॅक्सवेलच्या नेतृत्त्वाखालील मेलबर्न स्टार्स संघाने ६ विकेट्सने हा सामना जिंकली आहे. मार्कस स्टॉयनिस आणि निक लार्किन यांच्या ४३ धावांच्या आतिशी खेळीने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर गोलंदाज लियाम हॅचर यानेही सर्वाधिक ३ विकेट्स घेत संघासाठी महत्त्वपुर्ण भूमिका बजावली.

रेनेगेड्स संघाकडून फलंदाज सॅम हार्पर याने सर्वाधिक ६३ धावांची खेळी केली होती. परंतु, त्याची विकेट पडल्यानंतर इतर फलंदाज अधिक धावा करू शकले नाहीत. त्यामुळे मेलबर्न स्टार्सचे १५४ धावांचे आव्हान पूर्ण करण्याच्या आतच रेनेगेड्स संघ सर्वबाद झाला.

महत्त्वाच्या बातम्या-

तूम खेल के बारे में क्या जानते हो! भारताला इंग्लंडपासून सावध राहण्याचा सल्ला देणारा दिग्गज फॅन्सकडून ट्रोल

स्पायडर-पंत! आयसीसीने रिषभचा शेअर केलेला ‘तो’ गमतीशीर फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

विमानतळावरुन सिराजने धरली थेट स्मशानभूमीची वाट अन् वडिलांना वाहिली श्रद्धांजली, फोटो पाहून पाणावतील डोळे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---