भारताचा माजी फलंदाज आणि विश्वचषक विजेता प्रशिक्षक राहुल द्रविडला (Rahul Dravid) शनिवार (31 ऑगस्ट) रोजी मोठी बातमी मिळाली. वास्तविक, त्याचा मुलगा समित द्रविडची (Samit Dravid) भारताच्या अंडर-19 संघात निवड झाली आहे. समित भारतीय अंडर-19 संघासोबत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 एकदिवसीय आणि 2, चार दिवसीय सामने खेळताना दिसणार आहे.
सध्या भारतीय संघात निवड झाल्यानंतर समित द्रविड (Samit Dravid) खूप खूश आहे. नुकताच त्याने एका व्हिडिओद्वारे आपला आनंद व्यक्त केला आहे. समितने सांगितले की, भारतीय संघात निवड होणे हा त्याच्यासाठी किती मोठा क्षण आहे. स्टार स्पोर्ट्सने नुकताच त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये समित द्रविड भारतीय अंडर-19 संघात स्थान मिळवण्याबाबत बोलताना दिसत आहे.
समित द्रविड (Samit Dravid) म्हणाला, “सर्वप्रथम सर्वांना नमस्कार, माझी निवड झाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. मला खूप बरे वाटत आहे. या क्षणासाठी मी खूप मेहनत केली होती.” समितच्या कारकीर्दीसाठी हा मोठा क्षण आहे. तो म्हणाला, “भारताच्या जर्सीमध्ये खेळण्याचे माझे स्वप्न होते.”
View this post on Instagram
ऑस्ट्रेलियाच्या अंडर-19 संघाविरुद्ध भारताचा अंडर-19 संघ- रुद्र पटेल (उपकर्णधार), साहिल पारख, कार्तिकेय केपी, मोहम्मद अमन (कर्णधार), किरण चोरमले, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंश सिंग पंगालिया (यष्टीरक्षक), समित द्रविड, युधाजित गुहा, समर्थ एन, निखिल कुमार, चेतन शर्मा, हार्दिक राज, रोहित राजावत, मोहम्मद एनान
चार दिवसांच्या मालिकेसाठी भारतीय संघ- वैभव सूर्यवंशी, नित्या पंड्या, विहान मल्होत्रा (उपकर्णधार), सोहम पटवर्धन (कर्णधार), कार्तिकेय केपी, समित द्रविड, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंशसिंग पंगालिया (यष्टीरक्षक), चेतन शर्मा, समर्थ एन, आदित्य रावत, निखिल कुमार, अनमोलजीत सिंग, आदित्य सिंग, मोहम्मद एनान
महत्त्वाच्या बातम्या-
आश्चर्यकारक! 21 वर्षाच्या कारकीर्दीत ‘या’ खेळाडूनं कधीच नाही फेकला NO-BALL
हीच पाकिस्तानची ओळख! अशी कॅच सोडली, ज्यावर अंपायरचाही विश्वास बसेना
एकेकाळी संघाचा घातक गोलंदाज,आता खाजगी कंपनीत नोकर; दिग्गज क्रिकेटपटूची व्यथा