---Advertisement---

रत्नागिरी संघावर मात देत सांगली संघ पाचव्या स्थानावर

---Advertisement---

पुणे (24 मार्च 2024) – आजच्या दिवसाचा शेवटचा सामना रत्नागिरी विरुद्ध सांगली यांच्यात झाला. रत्नागिरी संघ 2 विजयासह पाचव्या स्थानी होता तर सांगली संघ 2 विजयासह सहाव्या स्थानावर होता. सांगली संघाने जोरदार सुरुवात करत आघाडी मिळवली. अभिराज पवार व अभिषेक गुंगे यांनी चतुरस्त्र चढाया करत गुण मिळवले. सामन्याच्या सहाव्या मिनिटाला सांगली ने रत्नागिरी संघाला ऑल करत 10-02 अशी आघाडी मिळवली.

सांगलीच्या शुभम पाटील ने अष्टपैलू खेळ करत सांगली संघाला आघाडी मिळवून दिली. मध्यांतरापुर्वी सांगली संघाने 24-15 अशी आघाडी मिळवली होती. मध्यंतरा नंतर ही सांगली संघाने आक्रमक खेळ कायन ठेवत संघाची कायन ठेवली. रत्नागिरी कडून अभिषेक शिंदे व पारस पाटील यांनी चपळाई चढाया करत गुण मिळवत सांगली संघाला ऑल आऊट सामन्यात चुरस आणली होती. मात्र सांगलीच्या अभिराज पवार ने सुपर टेन पूर्ण करत संघाची आघाडी कायम ठेवली.

सांगली संघाने अखेर पर्यत आघाडी कायम ठेवत सामना 43-33 असा जिंकला. सांगली कडून अभिराज पवार ने चढाईत 14 गुण मिळवले. शुभम पाटील ने अष्टपैलू खेळ करत पकडीत 5 तर चढाईत 4 असे एकूण 9 गुण मिळवले. अभिषेक गुंगे ने चढाईत 7 गुण मिळवले. प्रसन्ना पाटील व नवाज देसाई यांनी पकडीत प्रत्येकी 3 गुण मिळवले. रत्नागिरीच्या अभिषेक शिंदे चढाईत 8 गुण तर पारस पाटील ने अष्टपैलू खेळ करत 9 गुण मिळवले.

बेस्ट रेडर- अभिराज पवार, सांगली
बेस्ट डिफेंडर- शुभम पाटील, सांगली
कबड्डी का कमाल- शुभम पाटील, सांगली

महत्वाच्या बातम्या – 
तिसऱ्या विजयासह नंदुरबार संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी
प्रमोशन फेरीत अहमदनगर संघाचा विजयचा षटकार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---