भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधील तिसरा कसोटी सामना सिडनी येथे सुरू असून, सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने पूर्णतः पकड मिळवली आहे. भारतीय संघासाठी हा कसोटी सामना वाचवणे मोठे दिव्य असणार आहे. मात्र या दरम्यान भारतीय संघासाठी आशेचा किरण ठरला तो रवींद्र जडेजा गोलंदाजी व क्षेत्ररक्षणातील उत्तम फॉर्म. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जडेजाने उत्तम गोलंदाजी सोबतच एका अचूक थ्रोवर स्टीव स्मिथ ला धावबाद देखील केले. जडेजाच्या या अप्रतिम क्षेत्ररक्षणामुळे संपूर्ण क्रिकेटविश्वाकडून त्याचे कौतुक केले जात आहे. अशातच भारताचे माजी क्रिकेट खेळाडू संजय मांजरेकर यांनी देखील जडेजाची स्तुती केली आहे.
आपल्या ट्विटर अकाऊंटवर मांजरेकरांनी जडेजाचे कौतुक केले आहे. मांजरेकर लिहितात, “जडेजा व्यतिरिक्त कोणत्याच खेळाडूने हा धावबाद केला नसता. थ्रोची केवळ अचूकताच नाही तर ज्या गतीने जडेजाने थ्रो केला त्यामुळेच खेळाडू धावबाद झाला.”
Seemingly impossible that only Jadeja the fielder could have made possible. Not just the accuracy of the throw but the sheer speed of the throw was the key to that run out. Absolutely brilliant!
👏👏👏— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) January 8, 2021
जडेजा व मांजरेकर यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. वर्ल्डकप 2019 सेमीफायनल सामन्यापूर्वी मांजरेकरांनी जडेजाच्या संघातील स्थानाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मांजरेकरांनी जडेजामध्ये वनडे क्रिकेटसाठी गुणवत्ता कमी असल्याचे मत मांडले होते. त्यानंतर जडेजाने सेमीफायनल सामन्यात अर्धशतक झळकावल्यानंतर समालोचन करत असलेल्या मांजरेकरांकडे आपल्या बॅटने इशारा केला होता.
दरम्यान सामन्याचा विचार केला असता तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 2 गडी गमावत 103 धावापर्यंत मजल मारली होती.ऑस्ट्रेलियाची सामन्यातील आघाडी 197 धावांची झाली असून एखादा मोठा चमत्कारच भारताला पराभवापासून वाचवू शकतोय.
महत्वाच्या बातम्या:
पॅट कमिन्सची गोलंदाजी आणि भारतीय फलंदाजाला दुखापत, हे समीकरण तर ठरलेलंच! पाहा अजब योगायोग
दुःखद.! झहीर खानवर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे झाले निधन