इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम संपून काही दिवसच झाले आहेत. अजून या हंगामाच्या चर्चा थंडावल्या नाहीत, तोवर बीसीसीआयने आगामी आयपीएल २०२२ हंगामाची तयारीसुद्धा सुरू केली आहे. सोमवारी (२५ ऑक्टोबर) या हंगामात नव्याने सहभागी होणाऱ्या २ संघांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये आरपी संजीव गोयंका ग्रुपने लखनऊचा नवा संघ विकत घेतला आहे. तर सीव्हीसी कॅपिटलने अहमदाबादचा संघ खरेदी केला आहे. त्यातही गोयंका ग्रुपने लखनऊ संघाच्या खरेदी किंमतीसह सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
सोमवारी दुबई येथे आगामी हंगामात सहभागी होणाऱ्या २ नव्या संघांच्या मालकी हक्कासाठी लिलावाची प्रकिया पूर्ण झाली आहे. या लिलावात आरपी संजीव गोयंका ग्रुप आणि इरेलिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड (सीव्हीसी कॅपिटल पार्टनर्स) या कपंन्यांनी बाजी मारत नव्या संघांचे मालकी हक्क खरेदी केले आहेत. दुसऱ्यांदा आयपीएलमध्ये उतरलेल्या संजीव गोयंका ग्रुपने तब्बल ७०९० कोटींच्या बोलीसह लखनऊ संघ विकत घेतला आहे. यासह लखनऊचा संघ आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा संघ बनला आहे.
यापूर्वी मुंबई इंडियन्स संघ आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा संघ होता. मुकेश अंबानीने तब्बल ८३९ कोटी रुपये खर्च करत मुंबई संघाला विकत घेतले होते. परंतु आता संजीव गोयंका ग्रुपने मुंबईलाही मागे टाकले आहे.
महत्त्वाचे म्हणजे, याच संजीव गोयंका ग्रुपने यापूर्वीही आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाला विकत घेतले होते. २०१६ मध्ये त्यांनी या संघाला विकत घेतले होते. हा संघ २ वर्षे आयपीएलमध्ये खेळला आणि एक वेळा त्यांनी अंतिम सामन्यातही धडक मारली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
तोडफोड फलंदाजी! अफगानी फलंदाजाचा सॉलिड षटकार अन् सीमारेषेपार असलेल्या फ्रीजच्या फुटल्या काचा
‘भारताला हरवा, ब्लँक चेक मिळवा’, म्हणणारे रमीज राजा ट्रोल; नेटकरी म्हणाले, चुना लगा गया रे!
आजपर्यंत टी२० मध्ये कधीही न केलेली ‘अशी’ नकोशी कामगिरी स्कॉटलंडने केली अफगाणिस्तानविरुद्ध