---Advertisement---

क्या बात है! सर्फराज खानच्या भावाची मुंबईच्या रणजी संघात एंट्री, जबरदस्त फटकेबाजी करण्यात चांगलाच माहीर

Sarfaraz-Khan
---Advertisement---

रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या बाद फेरीचे सामने जून महिन्यात खेळले जाणार आहे. यामध्ये ६ जूनपासून मुंबई विरुद्ध उत्तराखंड हा सामना सुरू होणार आहे. या सामन्यासाठी मुंबईने २१ जणांचा संघ जाहीर केला आहे. यामध्ये त्यांनी नवीन खेळाडूला संघात घेतले आहे.

सर्फराज खान (Sarfaraz Khan) याचा भाऊ मूशीर खान (Musheer Khan) याची मुंबईच्या संघात निवड झाली आहे. पदार्पणाची संधी मिळालेला मूशीर सर्फराज सारखाच तुफानी फलंदाज आहे. सर्फराजही रणजीमध्ये मुंबई संघाकडून खेळत आहे. भावाची संघात निवड होईल असा त्याचा आत्मविश्वास होता, यामुळे त्याने किटमध्ये भावासाठी कॅप राखून ठेवली होती.

सर्फराज इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) दिल्ली कॅपिट्ल्स संघाकडून खेळतो. त्याने इंस्टाग्रामवर, “मूशीरची मुंबईच्या रणजी संघात निवड झाल्याचा मला खूप अभिमान आहे. आमच्या कुटुंबालाही याचा भरपूर आनंद झाला आहे,” असे कॅप्शन देत पोस्ट करत मूशीरचे अभिनंदन केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by SARFARAZ KHAN (@sarfarazkhan97)

नुकत्यात झालेल्या कूच बिहार ट्रॉफीच्या अंतिम फेरीत मुंबई संघाला पोहोचण्यास मूशीरने महत्वाची भूमिका निभावली होती. त्याने या स्पर्धेत ९ सामन्यात खेळताना ६७च्या सरासरीने ६७० धावा आणि ३२ विकेट्स घेत अष्टपैलू कामगिरी केली आहे. यामध्ये त्याच्या २ शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या मालिकावीराचा पुरस्कारही त्याने पटकावला. यामुळे त्याची मुंबईच्या रणजी संघात निवड करण्यास सोपे झाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Musheer khan (@musheerkhan.97) 

मूशीर हा १७ वर्षीय असून त्याने मुंबईच्या १९ वर्षाखालील संघामध्ये उत्तम कामगिरी केली. त्याचबरोबर त्याने २५ वर्षाखालील संघामध्येही तीन सामने खेळत ४०१ धावा केल्या. यात त्याने पदार्पणाच्या सामन्यात २६७ धावा केल्या होत्या. पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई संघात जलदगती गोलंदाज अर्जुन तेंडुलकर, प्रशांत सोलंकी, फलंदाज सूरज यादव यांना संघात जागा मिळाली नाही, तर अष्टपैलू शिवम दुबे आणि अजिंक्य रहाणे हे दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत.

मुंबईचा २१ जणांचा संघ-
पृथ्वी शॉ (कर्णधार), यशस्वी जयसवाल, भूपेन लालवानी, अरमान जाफर, सर्फराज खान, सुवेद पारकर, आकर्षित गोमेल, आदित्य तरे, हार्दिक तामोरे, अमन खान, साईराज पाटिल, तुषार देशपांडे, शम्स मुलानी, ध्रूमिल मतकर, तनूश कोटियन, शशांक अतारडे, धवल कुलकर्णी, मोहित अवस्थी, रोयस्तान दियास, सिद्धार्थ राऊत आणि मूशीर खान.

महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

भारीच ना! एबी डिविलियर्स पुन्हा दिसणार आरसीबी संघात, स्वत:च केलाय ‘मोठा’ खुलासा

‘मी तुझ्यापेक्षा चांगले क्रिकेट खेळून दाखवेल’, लाईव्ह शोमध्ये आमिर खानचे इरफानला चॅलेंज, पाहा पुढे काय झालं?

‘अनेकांनी घरी पाठवण्याची तयारी केलेली, म्हणूनच…’ टीम इंडियात पुनरागमन करणाऱ्या कार्तिकची प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---