सध्या रणजी ट्रॉफी स्पर्धेचे सामनेे खेळवले जात आहे. यात मुंबई संघाची ताकद वाढवणार आहे. मुंबई संघासाठी धमाकेदार प्रदर्शन करणाऱ्या सरफराज खान याचा भाऊ मुशीर खान हा देखील संघाचा भाग बनला आहे. रणजी ट्रॉफीमध्ये 27 डिसेंबरपासून खेळवल्या जात असलेल्या सामन्यात मुशीर खान याने आपले पदार्पण केले. सरफराज खान याने मुंबई संघासाठी चांगले प्रदर्शन केले होते. आता त्याचा भाऊ संघात सामील झाल्याने प्रतिस्पर्धी संघाची डोकेदुखी वाढली आहे आणि प्रेक्षकांना खान बंधूंची जोडी खेळताना दिसेल.
सरफराझ (Sarfaraz Khan) खान याच्याप्रमाणेच मुशीर देखील चांगला फलंदाज आहे. 17 वर्षीय हा खेळाडू उजव्या हाताचा फलंदाज आहे आणि तो डाावखुऱ्या हाताने गोलंदाजीही करतो. त्यामुळे मुंबईला एक फिरकीपटूही मिळाला आहे. आता त्याची प्रथम श्रेणी क्रिकेटच्या वाटचालीस सुरुवात झाली आहे. या दोन्ही भावांना मुंबई संघासाठी खेळताना बघणे हे बरेच रंजक असणार आहे. त्याला प्लेईंग इलेवनमध्ये संधी मिळाली तर आहे,पण या संधीचेे तो सोने करु शकेल की नाही हे बघण्यासारखे राहिल. जेव्हा त्याचा भाऊ सरफराज खान याला मुंबई संघासाठी खेळण्याची संधी मिळाली होती तेव्हा त्याने या संधीचेे सोने करुन दाखवले आणि आता तो मुंबई संघाच्या फलंदाजीच्या फळीचा अविभाज्य भाग.
मुशीरने याआधी मुंबईच्या अंडर-19 संघासाठी धमाकेदार प्रदर्शन केले होते. त्यानंतर त्याला मे महिन्यात रणजी ट्रॉफीच्या बाद फेरीतील सामन्यांसाठी निवडलेल्या संघात सामील केले गेले. मुंबईच्या रणजी संघात निवड होण्याआधी मुशीरने मुंबईच्या अंडर-19 संघाला कूचबिहार ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पोहोचवण्याचे काम केले होते. यामुळे त्याला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार देखील देण्यात आला होता. मुशीरने या स्पर्धेत 670 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर त्याने 32 विकेट देखील घेतल्या. तसेच, 17 वर्षीय या खेळाडूने मुंबईच्या अंडर-25 संघासाठी खेळताना तीन सामन्यात 401 धावा केल्या. यामध्ये मणिपूर विरुद्ध केलेल्या पदार्पणाच्या सामन्यात त्याने 267 धावांची खेळी केली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘धोनी भाईशी माझी तुलना होते, तेव्हा मी…’, बांगलादेशचे मैदान मारणाऱ्या ईशान किशनची खास प्रतिक्रिया
नाद नाद नादच! डेविड वॉर्नरने शंभराव्या कसोटीत झळकावली डबल सेंच्युरी, भीम पराक्रम केला नावावर