सध्या सर्वत्र टोकियो ऑलिंपिक २०२० च्या चर्चा रंगल्या आहेत. शुक्रवारपासून (२३ जुलै) या स्पर्धेचा शुभारंभ झाला असून भारतीय ऍथलिट्स आपल्या प्रदर्शनाचा ठसा उमटवताना दिसत आहेत. नुकतेच शनिवार रोजी जगातील दुसरा सर्वोत्कृष्ट नेमबाज सौरभ चौधरी याने पुरुषांच्या १० मीटर एयर पिस्टलच्या अंतिम फेरीचे तिकीट मिळवले आहे. आता त्याच्याकडून भारतीयांना सुवर्णपदकाची अपेक्षा असणार आहे.
सौरभने ६० शॉटच्या पात्रता फेरीत ६ सिरीजमध्ये एकूण ५८६ अंक मिळवत नेमबाजांच्या यादीत अव्वल स्थान पटाकवले आहे. त्याने पहिल्या सिरीजमध्ये ९५, दुसऱ्यामध्ये ९८, तिसऱ्यामध्ये ९८, चौथ्यामध्ये १००, पाचव्यामध्ये ९८ आणि सहाव्या सिरीजमध्ये ९७ गुण मिळवले आहेत.
Saurabh Chaudhary qualifies for the Men's 10m Air Pistol final 👏👏👏
He shot to the top of the qualification charts to earn a place in the last eight! 🎯#Tokyo2020 | #UnitedByEmotion | #StrongerTogether | @SChaudhary2002
— Olympic Khel (@OlympicKhel) July 24, 2021
पात्रता फेरीत सौरभनंतर चीनचा बोवेन झांग दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर जर्मनीच्या क्रिस्टियन रिट्सने तिसऱ्या क्रमांकावर ताबा मिळवला आहे. दुर्दैवाने दुसरा भारतीय नेमबाज अभिषेक वर्मा अंतिम सामन्यात पोहोचू शकला नाही. तो ५७५ गुणांसह १७ व्या क्रमांकावर आहे.