---Advertisement---

…म्हणून राफेल नदालने किस करत मागितली बॉर्ल गर्लची माफी, पहा व्हिडिओ

On: शुक्रवार, जानेवारी 24, 2020 1:47 PM
---Advertisement---

मेलबर्न। काल(23 जानेवारी) ऑस्ट्रेलियन ओपन 2020 मध्ये (Australian Open 2020) तिसऱ्या फेरीत स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदाल (Rafael Nadal) विरुद्ध अर्जेंटिनाच्या फेडरिको डेलबोनिसमध्ये(Federico Delbonis) सामना झाला. या सामन्यात एका क्षणी नदालने मारलेल्या एका शॉटवर एका बॉलगर्लच्या(ball girl) डोक्याला चेंडू लागला. त्यामुळे नदालने लगेचच तिची माफीही मागितली.

या लढतीत तिसऱ्या सेटमध्ये नदाल 4-1 अशा आघाडीवर असताना त्याने फॉरहँडचा एक फटका मारला. मात्र तो चेंडू अंपायर चेअर जवळ उभ्या असणाऱ्या बॉलगर्लला लागला. ते पाहूल लगेचच नदालने तिच्याजवळ जाऊन तिची विचारपूस केली. तसेच तिच्या गालावर किस करत तिची नदालने माफी मागितली.

तसेच त्याने या सामन्यात 6-3, 7-6(4), 6-1 अशा फरकाने विजय मिळवल्यानंतर त्याचा हेडबँड त्या बॉलगर्लला भेटही दिला. नदालच्या या कृतीमुळे त्याने अनेक चाहत्यांचे मन जिंकले आहे.

तसेच या घटनेबद्दल सामन्यानंतर नदाल म्हणाला, ‘तिच्यासाठी हा चांगला क्षण नसेल. तो चेंडू वेगाने गेला आणि तिच्या डोक्याला लागला. पण ती खूप शूर मुलगी आहे.’

तसेच यानंतर नदालची मुलाखत घेणाऱ्या सॅम्यूएल ग्रॉथ नदालला त्या बॉलगर्लला दिलेल्या किसबद्दल प्रश्न विचारताना म्हणाले की ‘पत्नीची काही सेंकदासाठी काळजी करु नकोस..’

यावर नदाल हसून म्हणाला, ‘त्याबद्दल मला काळजी नाही. कदाचित आम्ही आता 15 वर्षे एकत्र असल्याने ती जास्त काळजी करत नाही.’ या सामन्यावेळी नदालची पत्नीही उपस्थित होती.

तसेच नदाल पुढे म्हणाला, ‘टेनिस कोर्टवरील हा माझा एक अत्यंत धडकी भरवणारा क्षण होता. याआधी असे माझ्याबरोबर विंबल्डनमध्य झाले होते.’

https://twitter.com/AustralianOpen/status/1220324139296329730

त्याचबरोबर नदालने नंतर त्या बॉलगर्लच्या पालकांची आणि भावाचीही भेट घेतली. याबद्दल त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली.

https://twitter.com/RafaelNadal/status/1220589977836363776

नदालचा आता तिसऱ्या फेरीतील सामना उद्या (25 जानेवारी) स्पेनच्याच पाब्लो कॅरेनो बुस्ताविरुद्ध(Pablo Carreno Busta) होणार आहे.

https://twitter.com/Maha_Sports/status/1219985144490029056

https://twitter.com/Maha_Sports/status/1220606428345335808

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---