पाकिस्तानने क्रिकेट जगताला अनेक प्रतिभावान गोलंदाज दिले आहेत. यातच पाकिस्तानचा 20 वर्षीय युवा प्रतिभावान गोलंदाज शाहीन आफ्रिदी याने टी20 क्रिकेटमध्ये नुकताच एक विक्रम केला आहे. शाहिनने हा विक्रम पाकिस्तानच्या देशांतर्गत टी20 स्पर्धेचा राष्ट्रीय टी20 चषक खेळताना केला आहे. या स्पर्धेत शाहीन खैबर पख्तूनख्वा संघाकडून खेळत आहे. याच स्पर्धेत सिंध संघाविरुद्धच्या सामन्यादरम्यान शाहीनने शानदार गोलंदाजी केली आणि 5 बळी घेतले.
या पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाने टी20 क्रिकेटमध्ये चौथ्यांदा 5 बळी घेतले आहेत. टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा एका सामन्यात 5 किंवा अधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत शाहीन आफ्रिदी दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
तसे, टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा एका सामन्यात 5 किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेण्याचा विक्रम श्रीलंकेचा अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगाच्या नावावर आहे. त्याने तब्बल 5 वेळा अशी कामगिरी केली आहे.
या यादीत शाहीन आफ्रिदीने बांगलादेशचा फिरकीपटू शाकिब अल हसन आणि इंग्लंडचा अष्टपैलू डेविड वेस यांची बरोबरी केली आहे. डेविड आणि शाकिब यांनीही टी20 क्रिकेटमध्ये 4 वेळा एका सामन्यात 5 किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेण्याचा विक्रम केला आहे.
Another @iShaheenAfridi special!
LIVE: https://t.co/bw4fvXhVO2
WATCH: https://t.co/ADIl54kHMp#NationalT20Cup | #HarHaalMainCricket | #KPvSIN pic.twitter.com/cUgDctsSPY
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 5, 2020
Most 5-wicket hauls in T20s
5 Lasith Malinga
4 SHAHEEN AFRIDI
4 David Wiese
4 Shakib Al HasanShaheen has played only 56 matches, Malinga has 295 matches, Wiese 237 and Shakib 308. #NationalT20Cup
— Mazher Arshad (@MazherArshad) October 5, 2020
शाहीनने आपल्या कारकीर्दीत आत्तापर्यंत फक्त 56 टी20 सामने खेळले आहेत आणि इतक्या कमी सामन्यांमध्ये हा विक्रम करून त्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. मलिंगाने आपल्या टी20 कारकीर्दीत आतापर्यंत 295 सामने खेळले आहेत, तर डेविड वेसने 237 टी20 सामने खेळले आहेत. शाकिबने त्याच्या कारकीर्दीत आतापर्यंत 308 टी20 सामने खेळले आहेत.
शाहिन आफ्रिदीने आपला पहिला टी20 आंतरराष्ट्रीय सामना 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. त्याने आपल्या कारकिर्दीचा टी20 क्रिकेटमधील पहिला सामना 23 फेब्रुवारी 2018 रोजी लाहोर संघाकडून खेळला होता. कसोटीत शाहीनने 11 सामन्यात 35 बळी घेतले आहेत तर वनडेत 19 सामन्यात 40 बळी घेतले आहेत. त्याने 15 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 18 बळी घेतले आहेत.
याआधी शाहीनने व्हायटॅलिटी ब्लास्ट टी20 स्पर्धेत हॅम्पशायर संघाकडून खेळताना मिडलसेक्स विरुद्धच्या सामन्यात 4 चेंडूत 4 बळी घेतले होते. टी20 क्रिकेटमध्ये सलग 4 चेंडूत 4 बळी घेणारा शाहीन पहिला पाकिस्तानी गोलंदाज ठरला होता. तर अशी कामगिरी करणारा तो जगातील 7 वा गोलंदाज आहे.