भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सुरु असलेल्या बॉर्डर-गावसकर मालिकेमध्ये वेगवेगळे वाद होताना दिसत आहेत. सिडनी येथील कसोटी सामन्यात काही ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी भारतीय खेळाडूंवर वर्णभेदाची टीका केली तसेच याच सामन्यात स्टीव स्मिथने खेळपट्टीवर येऊन विचित्र कृती केली होती. आता ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेट खेळाडू शेन वॉर्न यांनी टी नटराजनने टाकलेल्या नो बॉल ची तुलना इंग्लंड येथे झालेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणासोबत केली आहे.
ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या सामन्यात टी नटराजनने तब्बल 7 नो बॉल टाकले. याबद्दल समालोचन करताना शेन वॉर्न म्हणाले की, “मला नटराजनच्या गोलंदाजी वेळी काही बाबी जाणवल्या आहेत. नटराजन याने 7 नो बॉल टाकलेले असून हे सर्वच फार मोठे आहेत. या 7 नो बॉल पैकी 5 नो बॉल षटकाच्या पहिल्याच चेंडूवर टाकलेले आहेत. आपण सर्वांनी गोलंदाजी करताना नो बॉल फेकलेले आहेत, पण 7 नो बॉल व त्यातील 5 षटकाच्या पहिल्या चेंडूवर फेकणे हे उत्सुकतेचे आहे.”
या दरम्यानच वॉर्न यांनी नटराजनच्या नो बॉल प्रसंगाची तुलना 2010 साली इंग्लंडमध्ये झालेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणाशी केली आहे. इंग्लंडमध्ये 2010 साली पाकिस्तानचा युवा गोलंदाज मोहम्मद आमिरने काही नो बॉल टाकले होते. या नो बॉल ची चौकशी केल्यानंतर बातमी पुढे आले की आमिरने स्पॉट फिक्सिंग केलेली होती.
वॉर्न सारख्या दिग्गज खेळाडूकडून अशा प्रकारचे वक्तव्य झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हे जाणून घेणे गरजेचे आहे की नटराजन आपला पहिलाच कसोटी सामना खेळत आहे.
महत्वाच्या बातम्या:
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : सांघिक कामगिरीच्या बळावर बडोदा बाद फेरीत, गुजरातचा केला पराभव
आयएसएल २०२०-२१ : दहा खेळाडूंनिशी ईस्ट बंगालने चेन्नईयीनला रोखले