स्वित्झर्लंड आणि लीव्हरपूलचा फुटबॉलपटू हेरडॅन शाकिरी याच्या मते लीव्हरपूल संघच यावर्षी चॅम्पियन्स लीग जिंकणार आहे.
मिडफिल्डर शाकिरीने 2013ला बायर्न म्युनिचकडून खेळताना चॅम्पियन्स लीग जिंकली आहे. बोरुसिया डॉर्टमुंड विरुद्ध झालेला हा सामना म्युनिचने 2-1ने जिंकला आहे.
मागच्या हंगामात लीव्हरपूल अंतिम सामन्यात रियल माद्रिद 3-1ने कडून पराभूत झाला होता. यातील दोन गोल तर गॅरेथ बॅले यानेच केले होते.
शाकिरी याआधी स्टोक सिटीकडून खेळत होता. तो यावर्षीच लीव्हरपूल संघाकडून खेळणार आहे.
“चॅम्पियन्स लीग जिंकण्याचा आंनद काही वेगळाच असतो. त्यामुळे मला ही लीग लीव्हरपूलला जिंकून देऊन पुन्हा तो आंनद अनुभवायचा आहे”, असे शाकिरी म्हणाला.
“यशस्वी होणे खुप महत्त्वाचे आहे. म्हणूनच आम्हाला या वर्षी विजेतेपद पटकावून यशस्वी व्हायचे आहे.”
“प्रशिक्षक युर्गन क्लोप यांच्या प्रशिक्षणाबद्दल माहिती आहे. ते बुन्देस्लीगा येथे झालेल्या 2013च्या चॅम्पियन्स लीग अंतिम सामन्यात बोरुसिया डॉर्टमुंडचे प्रशिक्षक होते”, असेही त्याने पुढे म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या-
–फिफा विश्वचषकात बेजांमिन पवार्डचा गोल ठरला रोनाल्डोपेक्षा भारी
–ब्राझिलचे प्रशिक्षक टिटे फिफा विश्वचषक २०२२पर्यंत प्रशिक्षक पदावर कायम