शेहान जयसूर्याने श्रीलंकन क्रिकेट बोर्डाशी संबंध तोडत स्वतःला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी अनुपलब्ध केले आहे. जयसूर्या हा श्रीलंकेचा प्रसिद्ध खेळाडू असून तो घरगुती क्रिकेटमध्ये चिल्लव मारियन्स संघाकडून खेळतो. जयसूर्या हा डावखुरा फलंदाज असून तो उजव्या हाताचा ऑफ ब्रेक गोलंदाज देखील आहे. जयसूर्याने श्रीलंकेकडून 12 एकदिवसीय आणि 18 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले आहेत.
आयसीसीने या संदर्भात माहिती देताना लिहले आहे की, शेहान जयसूर्याने श्रीलंकन क्रिकेट बोर्डला स्पष्ट केले आहे की तो यापुढे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकणार नाही. शेहानने आपले भविष्य आणि कुटुंबीयासाठी हा निर्णय घेतला आहे. शेहान लवकरच अमेरिकेत स्थलांतर करत आहे.
JUST IN: Shehan Jayasuriya has informed Sri Lanka Cricket that he will no longer be available for domestic or international tournaments, as he is moving to the USA with his family.
Jayasuriya has represented Sri Lanka in 12 ODIs and 18 T20Is. pic.twitter.com/EeIonzRZ7d
— ICC (@ICC) January 8, 2021
जयसुर्याच्या आंतरराष्ट्रीय कामगिरीचा विचार केला असता त्याने 12 एकदिवसीय सामन्यातील 10 डावांत 21.67 च्या सरासरीने 195 धावा केल्या आहेत. यात जयसुर्याची सर्वोच्च धावसंख्या 96 राहिलेली आहे. टी -20 क्रिकेटचा विचार केला असता जयसुर्याने 18 सामने खेळलेले आहेत. यात त्याने 241 धावा केलेल्या आहेत. गोलंदाजीत जयसुर्याने वन-डे व टी 20 क्रिकेट मध्ये प्रत्येकी 3-3 बळी मिळविले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
पुजाराची संथ फलंदाजी आणि प्रेक्षकाने भर मैदानातच घेतली डुलकी!
ऑलिंपिकमध्ये व्हावा टी-१० क्रिकेटचा समावेश, स्फोटक फलंदाज ख्रिस गेलची मागणी
आयडियाची कल्पना! लॅब्यूशानेने बॅटची ग्रीप बसवताना हँडेलवर फुंकर घातल्याचं हे होतं कारण