भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि शिखर धवन हैदराबाद विरुद्ध 25 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या रणजी सामन्यासाठी दिल्ली संघाकडून खेळतील.
बीसीसीआयने कार्यभार व्यवस्थापनामुळे रणजीच्या दोन सामन्यांसाठी इशांतला विश्रांती दिली होती, पंरतु आगामी न्यूझीलंड दौर्याचा विचार करता तो आधी रणजीचे सामने खेळेल.
धवनला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामन्यादरम्यान त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याच्या गुडघ्यावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली, त्याला 25 टाके घातले. या दुखापतीमुळे त्याला वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे आणि टी20 मालिकेसाठीही मुकावे लागले होते.
पण आता रणजी ट्रॉफीच्या सामन्यातून त्याला दुखापतीनंतर आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यापूर्वी स्व: ला आजमवण्याची चांगली संधी आहे.
त्यानंतर तो जानेवारीमध्ये 4 तारखेपासून सुरु होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन करेल.
याबद्दल निवड समीतीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद म्हणाले, इशांत आणि शिखर दिल्लीकडून खेळतील. या सामन्यावर माझे सहकारी सरनदीप सिंह लक्ष ठेवतील.
बुमराहचे झाले कमबॅक; ऑस्ट्रेलिया, श्रीलंका विरुद्ध मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
वाचा👉https://t.co/ISxcTSVj6O👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @Mazi_Marathi @MarathiRT @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) December 24, 2019
तिसऱ्या वनडेनंतर रविंद्र जडेजाने केले मोठे भाष्य, म्हणाला…
वाचा- 👉https://t.co/dkOeSQsA3e👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @Mazi_Marathi @MarathiRT @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) December 23, 2019