गुरूवार दि. 14 जूनपासून सुरू झालेल्या भारत-अफगानिस्तान कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी शिखर धवनने टी-20 स्टाईलने तडाखेबाज शतक झळकावले.
या शतकाबरोबरच शिखर धवन कसोटी सामन्यात उपहारापूर्वी शतक करणारा पहिला भारतीय फलंदाज बनला आहे.
धवनने पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात तुफान फटाकेबाजी करत 96 चेंडूत 107 धावा केल्या.
शिखर धवनच्या या शतकाबद्धल भारतीय फिरकीपटू हरभजन सिंगने धवनचे ट्वीटरवरून अभिनंदन करत एक मजेदार ट्वीट केले.
“बाय द वे जट्ट पाजी आयपीयल खतम हो गया हैं.” असे ट्वीट हरभजनने केले.
या ट्वीटला शिखर धवननेही मजेदार उत्तर दिले.
BTW jatt ji ipl khatam ho gayi hai😜 @SDhawan25 brilliant 100👏👏💪.. #IndvsAfganistan test cricket 🏏 @BCCI
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) June 14, 2018
IPL mein nahi bani uska hisaab yahan poora kar diya😉😉
— Shikhar Dhawan (@SDhawan25) June 14, 2018
शिखर धवनची आयपीयल मधिल कामगिरी चांगली झाली होती. पण 2018 च्या आयपीयल मध्ये तो शतक करू शकला नव्हता.
हाच धागा पकडत, ” आयपीयल मे नही बनी उसका हिसाब यहा पूरा कर दिया.” असे उत्तर सलामिवीर शिखर धवनने दिले.
शिखर धवनने 2018 च्या आयपीयल मध्ये 16 सामन्यात 4 अर्धशतकाच्या साह्याने 497 धावा केल्या होत्या. तर 92 नाबाद ही सर्वोच्च खेळी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या:
–टी-20 चा सुपरहीरो कसोटीमध्ये ठरला झीरो!
–माझ्या शतकामागे रशिद खानचा हात- शिखर धवन
–तब्बल 57 वर्षानंतर जुळून आला भारतीय क्रिकेटमध्ये हा योगायोग