महिला गटात शिवतेज क्रीडा मंडळ ठाणे तर पुरुष गटात हुतात्मा शांताराम कालवर संघांनी उल्हासनगर महापौर कबड्डी चषक स्पर्धेचं विजेतेपद पटाकवले.
महिला गटात शिवतेज क्रीडा मंडळ ठाणे विरुद्ध ज्ञानशक्ती क्रीडा मंडळ कल्याण संघात अंतिम लढत झाली. शिवतेज मंडळाने ४७-२५ असा एकतर्फी विजय मिळवत पहिल्या उल्हासनगर महापौर कबड्डी चषकावर नाव कोरले. माधुरी गवंडी, निकिता म्हात्रे, प्रणाली मोरे यांनी चांगला खेळ केला. त्याआधी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यांत शिवतेज ने संकल्प सिद्धी संघावर ४२-१५ असा विजय मिळवला. तर ज्ञानशक्तीने संकल्प ठाणे वर ३६-२६ असा विजय मिळवला.
पुरुष गटात हुतात्मा शांताराम कालवर संघाने जय बजरंग वशिंद संघास नमवत विजेतेपद पटकावले. हुतात्मा शांताराम कालवर संघाने ३९-२३ असा विजय मिळवला. परेश म्हात्रे, विकेश म्हात्रे यांनी चांगला खेळ केला. हुतात्मा शांताराम कालवर संघाने ३०-२९ असा ओम कल्याण संघावर विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती. तर जय बजरंग वाशीद संघाने मावळी मंडळावर ३३-२६ असा विजय मिळवला होता