मुंबई । महाराष्ट्र राज्य सरकारच्या शिवछत्रपती पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. यात उदय विश्वनाथ देशपांडे यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्काराने २०१७-१८ या वर्षासाठी गौरविण्यात येणार आहे.
कबड्डी खेळात पुण्याच्या विकास काळे आणि सायली संजय केरीपाळे या दोन खेळाडूंना सन्मानित करण्यात येणार आहे. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने या दोघांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.
सायलीने २०१८मध्ये आशियाई क्रिडास्पर्धांमध्ये भारतासाठी कबड्डीत रौप्यपदक जिंकले होते. तसेच तीने गेल्या काही वर्षीत चमकदार कामगिरी केली आहे. १९ ऑक्टोबर १९९४ रोजी जन्मलेल्या या प्रतिभावान खेळाडूने काही दिवसांतच कबड्डी जगताला आपली दखल घ्यायला लावली आहे.
६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचा जो संघ ११ वर्षांनी सुवर्णपदक जिंकला होता त्या संघाचा विकास काळे सदस्य होता. तसेच त्याच वर्षी पुणे संघाला राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा जिंकून देण्यात विकासने मोलाचा वाटा उचलला होता. ६४व्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य तर फेडरेशनकप स्पर्धेत रौप्य अशी अन्य दोन पदके विकासच्या नावावर आहेत.
सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि एक लाख रुपये असं या पुरस्काराच स्वरुप असून १७ फेब्रुवारी रोजी राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते गेटवे ऑफ इंडियाला त्यांचा हा सन्मान करण्यात येईल.
महत्त्वाच्या बातम्या-
–संपुर्ण यादी- शिवछत्रपती पुरस्कारांची घोषणा, स्मृती मानधनासह या खेळाडूंना मिळणार पुरस्कार
–संपूर्ण यादी: आजपर्यंतचे महाराष्ट्र केसरी कुस्ती गदेचे मानकरी
–भारताच्या सुरेश रैनासह हे ४ आहेत जाॅंटी रोड्सचे आवडते क्षेत्ररक्षक
–सुरेश रैनाच्या निधनाच्या सर्व बातम्या खोट्या, स्वत: रैनानेच केला खुलासा
–ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्माबद्दल होणार हा निर्णय
–अखेर फॅब४ मधील जो रुटने किंग कोहलीचा विक्रम मोडलाच, चारही खेळाडूंमधील स्पर्धा वाढली