पाकिस्तान संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने काल एका लाईव्ह सेशनमध्ये भारतीय क्रिकेटशी निगडीत अनेक गोष्टींना उजाळा दिला. तसेच अनेक गोष्टींचे खंडनही केले.
हॅलो एॅप या सोशल मीडिया माध्यमावर विरेंद्र सेहवाग आपल्याला कधीही ‘बेटा बेटा होता हैं, बाप बाप होता हैं!’ असं म्हटल्याचं शोएब अख्तरने खंडन केलं आहे. तसं सेहवागने केलं असतं तर आपण त्याला नक्की उत्तर दिलं असतं असंही शोएब अख्तर हॅलोच्या लाईव्ह सेशनमध्ये म्हणाला.
शिवाय भज्जीबरोबर झालेल्या एका घटनेचाही या लाईव्ह सेशनमध्ये अख्तरने खुलासा केला.
“हरभजन सिंगला मारण्यासाठी मी त्याच्या हॉटेल रुममध्ये गेलो होतो. आमच्यासोबत खातोस, फिरतोस, संस्कृती (पंजाबी) सारखी आहे. पंजाबी आहेस, माझ्या धाकट्या भावासारखा आहेस आणि माझ्यासोबत गैरवर्तन?” असे तो म्हणाला.
हा किस्सा नक्की कधीचा आहे, याबद्दल मात्र शोएब काहीही बोलला नाही.
“तुला (हरभजनला) हॉटेलमध्ये जाऊन मारणार, पण मारणार नक्की. त्याला (हरभजनला) माहित होतं की मी त्याला मारणार, सोडणार नाही. पण तो सापडलाच नाही. त्यानंतर माझा माझा राग शांत झाला. मग त्याने (हरभजनने) माझी माफी मागितली,” असेही या सेशनमध्ये पुढे म्हणाला.
बेटा बेटा होता हैं, बाप बाप होता हैं! सेहवागच्या त्या वक्तव्याबद्दल अख्तर काय म्हणतोय पहा…#म #मराठी @shoaib100mph @harbhajan_singh @virendersehwag @GautamGambhir pic.twitter.com/zhjiE5bZNY
— Maha Sports (@Maha_Sports) May 11, 2020
शोएब अख्तर भारताविरुद्ध १० कसोटी व २८ वनडे सामने खेळला. यात त्याने कसोटीत ३४.५०च्या सरासरीने २८ तर वनडेत २६.७६च्या सरासरीने ४१ विकेट्स घेतल्या होत्या.