भारतीय खेळाडू व पाकिस्तानी खेळाडूंमध्ये आयपीएल दरम्यान चांगले संबंध प्रस्थापित झाले होते. शोएब अख्तर जरी आयपीएलमध्ये खूप सामने खेळला नाही तरीही त्याचे भारतीयांशी खूप चांगले संबंध तयार झाले होते.
शाहरुख खान आपल्याला छोटा भाऊ मानत असे व त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकायला लागतं असे, असे शोएबने एका लाईव्ह शो दरम्यान सांगितले.
सलमान बरोबर माझी चांगली मैत्री आहे. मी एकदा सलमानकडे बाईक चालविण्याचा हट्ट केला होता. तेव्हा आम्ही एकदा सलमानच्या घरुन शाहरुखच्या घरापर्यंत सलमानबरोबर बाईकवर गेलो होतो. सलमान एक दिलदार माणूस असल्याचे शोएब या लाईव्ह दरम्यान म्हणाला.
तसेच तो कटरिनाला आपली बहीण मानतो.
एक दिवस बेंगलोरला कटरिना माझ्या जवळ आली. माझ्या गळ्यात पडत तिने मला एक खास गोष्ट सांगितली. सलमान व तुला बातम्यांपासून दुर ठेवणे केवळ अवघड असल्याचे तीने सांगितले. तसेच तुम्ही दोघे सतत वादात सापडता असेही ती पुढे म्हटली, असे शोएब म्हणाला. कटरीना आपल्याला बहीणीसारखी असल्याचेही त्याने यावेळी सांगितले.