माऊंट मॉनगनुई। काल(2 फेब्रुवारी) भारताने न्यूझीलंड विरुद्ध पाचवा आणि शेवटचा टी20 सामना 7 धावांनी जिंकत 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 5-0 असा विजय मिळवला. या विजयाबरोबर भारताने मोठा पराक्रम केला आहे. भारत 5 सामन्यांच्या द्विपक्षीय टी20 मालिकेतील सर्व सामने जिंकणारा जगातील पहिलाच संघ ठरला आहे.
काल हा विजय भारतीय संघाने मिळवल्यानंतर बीसीसीआयने एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओमध्ये भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर आणि फिरकीपटू युजवेंद्र चहल डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओला ‘विक्ट्री डान्स’, असे बीसीसीआयने कॅप्शन दिले आहे.
हा व्हिडिओ भारताने काल विजय मिळवल्यानंतर लगेचच शूट केले असल्याचेही या व्हिडिओतून स्पष्ट होत आहे.
https://www.instagram.com/p/B8D_Ml0AMNK/
विशेष म्हणजे भारतीय संघाने वेलिंग्टन येथे शुक्रवारी न्यूझीलंड विरुद्ध चौथा सामना जिंकल्यानंतरही साधारण अशाच प्रकारचा डान्स भारताच्या काही खेळाडूंनी केला होता. हा व्हिडिओ चहलने शेअर केला होता.
ज्यामध्ये चहल, शिवम दुबे आणि अय्यर आणखी एका भारतीय खेळाडूबरोबर डान्स करताना दिसत होते. पण तो एक खेळाडू कोण होता. याबद्दल खूप चर्चा झाली. कारण तो खेळाडू टोपी घालून डोके खाली करत अय्यरच्या मागे उभा राहून नाचत होता. त्यामुळे तो खेळाडू नक्की कोण आहे, याबद्दल चाहत्यांनी विविध अंदाज वर्तवले होते. पण अनेकांनी हा खेळाडू रोहित शर्माच असल्याचे म्हटले होते.
https://twitter.com/Rockykiccha45/status/1223463923229151233?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1223463923229151233&ref_url=https%3A%2F%2Fmahasports.glteyepbzg-jqp3vl997450.p.temp-site.link%2Fchahal-shivam-dube-shreyas-iyer-dance-with-mystery-man%2F
सामन्यादरम्यान विलियम्सनबरोबर काय झाली चर्चा? विराट कोहलीने दिले हे उत्तर
वाचा👉https://t.co/oAUmRri5Re👈#म #मराठी #Cricket #NZvIND #TeamIndia @imVkohli #KaneWilliamson— Maha Sports (@Maha_Sports) February 3, 2020
विराट कोहली, केन विलियम्सनच्या त्या खास फोटोवर चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया
वाचा👉https://t.co/84MbD8q1zX👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND @imVkohli #KaneWilliamson— Maha Sports (@Maha_Sports) February 3, 2020