एका क्रिकेटपटूसाठी सर्वात महत्त्वाची असते त्याची फिटनेस, ज्याला मराठीत तंदुरुस्ती असे म्हटले जाते. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला क्रिकेट जगतातील सर्वात तंदुरुस्त खेळाडूंमध्ये गणले जाते. तो अतिशय अवघड असे व्यायामाचे प्रकारही अगदी सहजपणे करताना दिसतो. विराटप्रमाणे भारताचा आक्रमक फलंदाज श्रेयस अय्यर याचीही तंरुदुस्त क्रिकेटपटूंमध्ये गणना केली जाते.
उजव्या हाताचा फलंदाज अय्यर हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. तो नेहमी आपल्या ट्विटर किंवा इंस्टाग्राम अकाउंटवर जिममध्ये घाम गाळतानाचे व्हिडिओ शेअर करत असतो. नुकताच त्याचा असाच एक नवा व्हिडिओ पुढे आला आहे.
या व्हिडिओत अय्यर व्यायाम करण्याच्या एका साधनावर पायांच्या आधारे लटकत असल्याचे दिसत आहे. अशा अवस्थेत तो हळूहळू हात वर करत दोरी पकडून वरच्या दिशेने चढल्याची कृती करत आहे. त्याला पाहून खरोखरच एखादी अदृश्य दोरी वर बांधलेली असावी आणि ती दोरी पकडून तो वर चढत असल्याचे भासत आहे.
अय्यरने आपल्या अचंबित करणाऱ्या लवचिकतेचा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये माकडाचे इमोजी दिले आहेत. अर्थातच अय्यरला असे म्हणायचे आहे की, तो माकडाप्रमाणे झाड्याच्या फांदीवर चढत असल्याची नक्कल करत आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होत आहे. सोबतच या व्हिडिओवर नेटिझन्सच्य वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
🐵🐒🙈 pic.twitter.com/3k27bMT4nO
— Shreyas Iyer (@ShreyasIyer15) January 14, 2021
श्रेयस अय्यर हा भारताच्या वनडे आणि टी२० संघाचा प्रमुख फलंदाज आहे. नुकत्याच ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत त्याने एकूण ५९ धावा केल्या आहेत. मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती.
सोबतच ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात तो संघाबाहेर होता. त्यानंतर पुढील दोन टी२० सामन्यात तो विशेष कामगिरी करु शकला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
शुबमन गिल बॅटवरचे स्टिकर सिडनीतच विसरला? पाहा नक्की काय आहे प्रकरण
द्विशतक एक विक्रम अनेक! वाचा श्रीलंकाविरुद्ध डबल सेंचूरी करत जो रुटच्या नावावर झालेले रेकॉर्ड्स