पुणे। नवसह्याद्री क्रीडा संकुल व एम टेनिस अकादमी यांच्या वतीने आयोजित एमएसएलटीए-योनेक्स सनराईज अखिल भारतीय मानांकन टॅलेंट सिरीज 14 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात श्रीया देशपांडे हिने, तर मुलांच्या गटात बालावीर सिंग या खेळाडूंनी मानांकित खेळाडूवर विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
एरंडवणा येथील नवसह्याद्री क्रीडा संकुल येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये एकेरीत उपांत्य फेरीत मुलींच्या गटात बिगरमानांकीत श्रीया देशपांडे हिने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत अव्वल मानांकित जुई काळेचा 6-4, 6-2 असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत दुसऱ्या मानांकित सिया प्रसादेने आकांक्षा अग्निहोत्रीचा 6-3, 2-6, 6-2 असा तीन सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत स्थान मिळविले. अंतिम फेरीत सियाचा सामना श्रीया देशपांडे हिच्याशी असणार आहे.
मुलांच्या गटात उपांत्य फेरीत चौथ्या मानांकित बालावीर सिंग याने अव्वल मानांकित पार्थ देवरुखकरचा 6-4, 6-3 असा पराभव करून स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवले. दुसऱ्या मानांकित अद्विक नाटेकर याने सहाव्या मानांकित आर्यन घाटगेचा 6-3, 7-5 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
दुहेरीत मुलांच्या गटात उपांत्य फेरीत अभय नागराजन याने अर्चित धूतच्या साथीत अर्जुन कीर्तने व आदित्य भटवेरा यांचा 3-6, 7-5, 10-8 असा तर, अभिराम निलाखे व अद्विक नाटेकर यांनी श्लोक गांधी व ओंकार शिंदे यांचा 2-6, 6-3, 10-6 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल उपांत्य फेरी।
14 वर्षाखालील मुले।
बालावीर सिंग(4) वि.वि.पार्थ देवरुखकर(1)6-4, 6-3;
अद्विक नाटेकर(2) वि.वि.आर्यन घाटगे(6)6-3, 7-5;
14 वर्षाखालील मुली।
श्रीया देशपांडे वि.वि.जुई काळे(1)6-4, 6-2;
सिया प्रसादे(2) वि.वि.आकांक्षा अग्निहोत्री 6-3, 2-6, 6-2;
दुहेरी गट। उपांत्य फेरी। मुले।
अभय नागराजन/अर्चित धूत वि.वि.अर्जुन कीर्तने/आदित्य भटवेरा 3-6, 7-5, 10-8;
अभिराम निलाखे/अद्विक नाटेकर वि.वि.श्लोक गांधी/ओंकार शिंदे 2-6, 6-3, 10-6;