पाचगणी | रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल नॅशनल सिरिज 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात परी सिंग, अभया वेमुरी यांनी तर मुलांच्या गटात अर्जुन कुंडू, सॅम चावला या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरी गटात 16 वर्षाखालील मुलींच्या गटात हरियाणाच्या तिसऱ्या मानांकित परी सिंग हिने क्वालिफायर तामिळनाडूच्या लक्ष्मी अरूणकुमारचा 6-4, 6-3 असा संघर्षपूर्ण पराभव अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या फेरीच्या लढतीत तेलंगणाच्या चौदाव्या मानांकित अभया वेमुरी हिने मध्यप्रदेशच्या अमिशी शुक्लाचे आव्हान 7-5, 6-4 असे संपुष्टात आणले.
मुलांच्या गटात गुजरातच्या मानांकित अर्जुन कुंडू याने आपल्या लौकिकाकाला साजेशी खेळता कर्नाटकच्या अर्जुन प्रेमकुमारचा टायब्रेकमध्ये 6-1, 7-6(2) असा पराभव अंतिम फेरी गाठली. दिल्लीच्या सॅम चावलाने छत्तीसगडच्या अजय सिंगचा 4-6, 6-1, 6-3 असा तीन सेटमध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
दुहेरीत मुलांच्या गटात आकाश देबने यशराज दळवीच्या साथीत कुश अरजेरिया व आयुष्मान अरजेरिया यांचा 7-6(1), 6-4, असा तर, फरहान पत्रावाला व धन्या शहा यांनी शिवम कदम व निरव शेट्टी यांचा 6-3, 7-6(5) असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- एकेरी गट: उपांत्य फेरी- 16 वर्षाखालील मुली
परी सिंग(हरियाणा)(3) वि.वि. लक्ष्मी अरूणकुमार(तमिळनाडू)6-4, 6-3;
अभया वेमुरी(तेलंगणा)(14) वि.वि. अमिशी शुक्ला(मध्यप्रदेश)7-5, 6-4;
उपांत्य फेरी- 16 वर्षाखालील मुले
अर्जुन कुंडू(गुजरात)(1)वि.वि.अर्जुन प्रेमकुमार(कर्नाटक)6-1, 7-6(2);
सॅम चावला(दिल्ली)(12)वि.वि.अजय सिंग(छत्तीसगड)4-6, 6-1, 6-3.
दुहेरी गट: मुले: उपांत्यपूर्व फेरी:
आकाश देब/ यशराज दळवी वि.वि.कुश अरजेरिया/आयुष्मान अरजेरिया 7-6(1), 6-4;
फरहान पत्रावाला/धन्या शहा वि.वि.शिवम कदम/निरव शेट्टी 6-3, 7-6(5);
अनर्घ गांगुली/कार्तिक सक्सेना वि.वि.रोनीन लोटलीकर/मोनिन लोटलीकर 6-2, 6-2;
जितीन छेत्री/सुखप्रीत झोजे वि.वि.भूषण हॊबम/अजय सिंग 6-4, 6-4;
मुली:
काव्या खिरवाल/हनह नागपाल वि.वि.लक्ष्मी अरुणकुमार/कुमकुम नीला 7-5, 6-1;
चहाना बुद्धबती/तनुश्री पांडे वि.वि.माही पांचाळ/आरणी रेड्डी 6-3, 6-1;
मेखला मन्ना/पवित्रा रेड्डी वि.वि.पुनर्वा शहा/अमिशी शुक्ला 6-2, 3-6, 10-3;
अभया वेमुरी/अपूर्वा वेमुरी वि.वि.सई भोयर/इशिता जाधव 6-4, 7-6(5).