---Advertisement---

थोडक्यात वाचला कोहली! नाहीतर बसला असता ‘विराट’ दणका

On: सोमवार, ऑक्टोबर 5, 2020 8:18 PM
---Advertisement---

आयपीएल २०२०मधील १९वा सामना सोमवारी (५ ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. या सामन्यात नाणेफेक जिंकून बेंगलोर संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि दिल्ली संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. यादरम्यान विराटची हुशारी पाहायला मिळाली.

झाले असे की, दिल्ली संघाकडून सलामीला पृथ्वी शॉ आणि शिखर धवन फलंदाजी करत होते. यादरम्यान तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू शॉने कव्हर ड्राइव्हच्या दिशेने फटकावला. तो चेंडू तिथे उभा असलेल्या विराटकडे गेला. यादरम्यान तो मोठी चूक करण्यापासून वाचला. शॉने मारलेला चेंडू विराटने अडवला आणि त्या चेंडूवर तो आपली लाळ लावणार होता. परंतु लगेच त्याने चेंडूवर लाळ लावण्यासाठी उचलेला आपला हात लांब घेतला. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

यावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही ट्वीट करत म्हटले आहे की, “चेंडूवर लाळ लावणारच तेवढ्यात विराटची मिलियन डॉलर्सची रिऍक्शन.”

https://twitter.com/sachin_rt/status/1313120919439671298

यादरम्यानचे फोटो ट्विटरवर शेअर करत चाहत्यांनी आपापल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

https://twitter.com/Badka_Bokrait/status/1313122522007625728

https://twitter.com/vinayakkm/status/1313120460263940097

https://twitter.com/nawaabshahab/status/1313120931317858305

https://twitter.com/RuchiTufun/status/1313120879534993408

https://twitter.com/sunnyrbbr/status/1313120771179311105

https://twitter.com/Crick4ever/status/1313120572264517632

https://twitter.com/PiyushSaxena_92/status/1313119918292791296

यादरम्यान काही चाहत्यांनी असेही म्हटले आहे की, काही वेळा आपल्या जुन्या सवयी सोडणे कठीण असते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---