भारताचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) सध्याचा अध्यक्ष सौरव गांगुलीला गुरुवारी (७ जानेवारी) हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे. त्याला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
गांगुलीने मानले आभार
बीसीसीआयचा अध्यक्ष गांगुलीने हॉस्पिटलमधून घरी परताना म्हटले आहे की ‘मी डॉक्टरांचे आणि उपचारासाठी हॉस्पिटलचे आभार मानतो. मी ठिक आहे.’
जिममध्ये व्यायाम करताना छातीत दुखण्याबद्दल केली होती तक्रार –
शनिवारी (३ जानेवारी) सकाळी जिममध्ये व्यायाम करताना गांगुलीने छातीत दुखू लागल्याची तक्रार केली होती. त्यामुळे त्याला लगेचच कोलकातामधील वुडलँड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्याच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यात ३ ब्लॉकेजेस असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्याच्या हृदयाच्या रक्तवाहिनीत एक स्टेंट टाकण्यात आला होता.
घरामधे लक्ष ठेवणार डॉक्टर
वुडलँड्स हॉस्पिटलच्या सीईओ रुपाली बासू काही दिवसांपूर्वी म्हणाल्या होत्या की, “सौरव गांगुली यांना हॉस्पिटलमधून सुट्टी दिल्यानंतर, नियमितपणे त्यांच्या घरी त्यांच्यावर लक्ष ठेवले जाईल.”
महत्त्वाच्या बातम्या –
AUS v IND : पुरुषांच्या कसोटी सामन्यात पहिल्यांदाच महिलेने केले अंपायरींग, सिडनीत रचला इतिहास
व्हिडिओ : राष्ट्रगीत सुरु असतानाच मोहम्मद सिराज झाला भावूक; अश्रूही झाले अनावर
‘धोकादायक’ डेविड वॉर्नरला बाद केल्यानंतर मोहम्मद सिराजने केले जोरदार सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ