आयपीएलच्या आगामी हंगामाची चाहत्यांनी नक्कीच उत्सुकता लागली असेल. तत्पूर्वी आयपीएल 2025च्या मेगा लिलावात (IPL Mega Auction 2025), असे अनेक खेळाडू विकले गेले नाहीत, जे आता इतर टी20 लीगमध्ये धुमाकूळ घालताना दिसत आहेत. अशाच एका खेळाडूने आजकाल खेळल्या जाणाऱ्या एसए20 लीगमध्ये सर्वाधिक धावा केल्या.
या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा रस्सी व्हॅन डर ड्यूसेन (Rassie van der Dussen) एमआय केपटाऊनकडून खेळत आहे. दरम्यान त्याने 9 सामने खेळल्यानंतर तो स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.
ड्यूसेनने आयपीएल 2025 साठी त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये ठेवली होती, परंतु कोणत्याही संघाने त्याला खरेदी केले नाही. यापूर्वी, तो आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून (RR) खेळताना दिसला होता, जो त्याचा पहिलाच हंगाम होता. ड्यूसेनने आतापर्यंत त्याच्या आयपीएल कारकिर्दीत फक्त 3 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 33 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 12 धावा आहे.
2025च्या एसए20 मध्ये एमआय केपटाऊनकडून खेळताना ड्यूसेनने अद्भुत फलंदाजी केली. त्याने आतापर्यंत स्पर्धेत 9 सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने 9 डावात फलंदाजी करताना 55.00च्या सरासरीने 330 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 91 धावा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा; महाराष्ट्राचे दोन्ही खो खो संघ जेतेपदापासून एक पाऊल दूर!
38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा; रग्बीमध्ये महाराष्ट्राला 1 रौप्य, 1 कांस्यपदक
38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा; कबड्डीत महिलांच्या गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत