क्रीडाविश्वातून आनंदाची बातमी समोर येत आहे. शनिवारी (दि. 9 ऑक्टोबर) स्पॅनिश टेनिस स्टार राफेल नदाल हा बापमाणूस बनला आहे. स्पॅनिश माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, नदालची पत्नी मारिया फ्रान्सिस्का पेरेलो हिने मालोर्का येथील एका हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला आहे. जोडप्याचे हे पहिलेच अपत्य आहे. ही आनंदाची बातमी सर्वत्र पसरताच त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुरुष टेनिसमध्ये 22 ग्रँडस्लॅम किताब जिंकणाऱ्या नदालची गणना जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये होते.
रियल माद्रिदनेही दिल्या शुभेच्छा
स्पेनचे फुटबॉल क्लब रियल माद्रिद (Real Madrid) यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून राफेल नदाल (Rafael Nadal) याला पुत्रप्राप्तीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी लिहिले की, “आमचा प्रिय मानद सदस्य राफेल नदाल आणि मारिया पेरेलो यांना त्यांच्या पहिल्या बाळाच्या जन्मासाठी खूप खूप शुभेच्छा. या क्षणाचा आनंद वाटण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत. शुभेच्छा.” मात्र, जेव्हा नदाल याच्या जनसंपर्क फर्मला याबद्दल विचारण्यात आले असता, त्यांनी म्हटले की, ते नदालच्या खासगी गोष्टींवर कोणतीही टिप्पणी करणार नाहीत.
Congratulations to our dear honorary member @RafaelNadal and to María Perelló for the birth of their first child. We join you in sharing the happiness of this moment. All the best!
— Real Madrid C.F. 🇬🇧🇺🇸 (@realmadriden) October 8, 2022
कधी झाले होते लग्न?
राफेल नदाल (Rafael Nadal) आणि मारिया फ्रान्सिस्का पेरेलो (Maria Francisca Perello) यांचे लग्न 3 वर्षांपूर्वी म्हणजेच ऑक्टोबर 2019मध्ये झाले होते. या लग्नासाठी फक्त त्यांच्या जवळच्या व्यक्तींनाच आमंत्रित करण्यात आले होते. त्यापूर्वी दोघांनीही जानेवारीमध्ये त्यांच्या साखरपुड्याची घोषणा केली होती. नदाल आणि मारिया हे 2005पासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, त्यापूर्वीपासून ते एकमेकांना ओळखतात. मारिया लाईमलाईटपासून शक्यतो दूरच राहते. दुसरीकडे ती नदालच्या सामन्यांमध्येही खूप कमी वेळा दिसते.
मारिया फ्रान्सिस्का पेरेलो ही लंडनमध्ये स्पोर्ट्स मार्केटर म्हणून काम करत होती. मात्र, सध्या ती राफा नदाल फाऊंडेशनसाठी प्रकल्प संचालक म्हणून काम करते. नदालने 2008 मध्ये या संस्थेची स्थापना केली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय संघाला मिळाला नवा अष्टपैलू, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत केले आंतरराष्ट्रीय पदार्पण
INDvSA: रांची वनडेत नाण्याचा कौल दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेवन