लंडन | एटीपी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या राफेल नदालने २०११ नंतर प्रथमच विंम्बलडन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
सोमवारी (९ जुलैला) झालेल्या सामन्यात झेक प्रजास्ताकच्या जीरी वेस्लीचा ६-३, ६-३, ६-४ असा पराभव करत सात वर्षांनंतर विंम्बलडन स्पर्धेच्या उपांत्य पूर्व फेरीत स्थान मिळवले.
उपांत्य पूर्व फेरीत राफेल नदालला पाचव्या मानांकित अर्जेंटीनाच्या जुआन मार्टीन डेल पेट्रो किंवा फ्रान्सचा बिगर मानांकित गिल्स सिमोनचा सामना करावा लागणार आहे.
या विजयानंतर नदालने पत्रकारांशी बोलताना आनंद व्यक्त केला. तसेच रॉजर फेडररशी अंतिम सामन्यात खेळण्याची इच्छा व्यक्त केली.
“हो, मला माहित आहे खूप काळानंतर मी विंम्बलडनच्या अंतिम ८ मध्ये स्थान मिळवले आहे. मी ज्यावेळी इथे येतो त्यावेळी पूर्णपणे जिंकण्याच्या इराद्याने येतो.” असे २००८ आणि २०१० चा विंम्बलडन विजेता राफेल नदाल म्हणाला.
जगभरातील टेनिस रसिक राफेल नदाल आणि रॉजर फेडरर या दिग्गजांना अंतिम सामन्यात खेळताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
“जर मी आणि रॉजर अंतिम सामन्यात पोहचलो तर माझ्यासाठी तो सामना आव्हानात्मक असेल. पण त्या सामन्यासाठी मी उत्सुक अाहे.” असे क्ले कोर्टचा किंग राफेल नदाल म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या-
नदालचा हा फोटो का होतोय एवढा व्हायरल, काय आहे कारण?
–इंग्लंडच्या चाहत्यांसमोर विंबल्डन आणि फूटबाॅल फायनल पाहण्याचा यक्ष प्रश्न