श्रीलंका क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज अकिला धनंजयला पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजीची परवानगी देण्यात आली आहे. धनंजयच्या गोलंदाजी ॲक्शन बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते व त्यामुळे त्याला जवळजवळ वर्षभर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यापासून निर्बंध लादले गेले होते. धनंजयने आपल्या गोलंदाजी ॲक्शन मध्ये बदल करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे.
सप्टेंबर 2019 साली धनंजयच्या गोलंदाजीवर बंदी घालण्यात आली होती. गॉल येथे न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान त्याची गोलंदाजीची ॲक्शन सदोष असल्याचे आढळले होते. यानंतर त्याच्यावर एक वर्षासाठी गोलंदाजी करण्यास बंदी घालण्यात आली. ऑगस्ट 2020 मध्ये त्याचे एक वर्षाचे निलंबन संपले.
धनंजयला पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्याची परवानगी देत आयसीसी म्हणाले, “मेडिकल वर्क आणि पूर्णपणे विश्लेषण केल्यानंतर श्रीलंकेचा फिरकीपटू अकिला धनंजयची गोलंदाजी ॲक्शन योग्य मानण्यात आली आहे. आता धनंजय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा गोलंदाजी करू शकतो.”
श्रीलंकन क्रिकेट बोर्डाकडून एक व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला व त्याद्वारे आयसीसीने धनंजयला गोलंदाजी करण्याची परवानगी दिली. व्हिडिओ पाठवण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे कोरोनामुळे आयसीसीची बायोकेमिकल्स लॅब बंद आहे.
धनंजयच्या आगमनाने श्रीलंकन क्रिकेट संघ आणखीन मजबूत होण्यास मदत होईल. नुकताच श्रीलंकेचा दक्षिण आफ्रिका दौरा झाला असून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्यांचा मानहानिकारक पराभव झाला होता. धनंजयच्या आगमनाने श्रीलंकन संघ निश्चितच नव्या जोशाने मैदानात उतरेल.
महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी.! टीम इंडियाला आणखीन एक धक्का, रविंद्र जडेजा कसोटी मालिकेतून आऊट
इरफान पठाणचे पदार्पण; पण क्रिकेटच्या नव्हे तर सिनेसृष्टीच्या पिचवर, पाहा फिल्मचा टीझर
सबस्टिट्युट विकेटकिपर म्हणजे काय रे भाऊ? नियमाचा भारतच होता पहिला लाभार्थी; जाणून घ्या