सेंट व्हिन्सेंट आणि जेएन पेटिट टेक्निकल प्रशाला संघांनी शनिवारी (दि. 26 नोव्हेंबर) येथील लॉयला फुटबॉल चषक स्पर्धेत चमकदार विजयाची नोंद केली.
स्पर्धेतील 12 वर्षांखालील गटात सेंट व्हिन्सेंटच्या एचएस संघाने कल्याणी शाळेचा 1-0 असा पराभव केला. सम्यक भंडारीने सामन्यातील एकमात्र विजयी गोल 19व्या मिनिटाला केला. 14 वर्षांखालील गटात मात्र, कल्याणी शाळेने सेंट व्हिन्सेंट एचएस संघाला गोलशून्य बरोबरीत रोखले.
जे.एन. पेटिट प्रशाला संघाने दोन विजय मिळविले. मुलांच्या 14 वर्षांखालील गटात जे.एन. पेटिटने पाच मिनिटांच्या कालावधीत दोन गोल करत विद्या भवनला 2-0 असे पराभूत केले. सिद्धांत साळुंकेने 43, तर सादिक सय्यदने 48व्या मिनिटाला गोल केला.
त्यानंतर निधिश भोसलेने (5वा, 49वे मिनिट) केलेल्या दोन गोलच्या जोरावर जे.एन. पेटिट प्रशाला संघाने 16 वर्षांखालील गटातही विद्या भवन प्रशाला संघावर 2-0 असाच विजय मिळविला.
निकाल
12 वर्षांखालील: सेंट व्हिन्सेंट प्रशाला : 1 (सम्यक भंडारी 19वे मिनिट) वि.वि. कल्याणी स्कूल: 0
14 वर्षांखालील : सेंट व्हिन्सेंट प्रशाला : 0 अनिर्णित वि. कल्याणी स्कूल: 0
जेएन पेटिट : 2 (सिद्धांत साळुंके 43वे; सादिक सय्यद 48 वे मिनिट) वि.वि. विद्या भवन प्रशाला: 0
16 वर्षांखालील : जेएन पेटिट : 2 (निधीश भोसले 5वे, 49वे मिनिट) वि.वि. विद्या भवन प्रशाला: 0
निकाल (गुरुवार):
12 वर्षाखालील: एसएसपीएमएस (बोर्डिंग): 4 (रक्षीद पाटील 2रे, 18वे; स्वराज माने 11वे; भद्रा निकुभ 25वे) वि.वि. डॉ. शामराव कलमाडी प्रशाला : 0
14 वर्षांखालील: डॉ. शामराव कलमाडी प्रशाला : 1 (रुद्र नलावडे 25वे मिनिट) वि.वि. एसएसपीएमएस (बोर्डिंग) : 0
डॉ. शामराव कलमाडी प्रशाला : 5 (तनिश अयचिते 6, 20, 30वे मिनिट; दर्श सोळंकी 44, 61वे मिनिट) वि.वि. एसएसपीएमएस (बोर्डिंग) : 2 (श्रीनिवास महाले 8, 63वे मिनिट)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दणदणीत विजयासह मुंबई सिटी एफसी टेबल टॉपर; नॉर्थ ईस्ट युनायटेडचा सलग सातवा पराभव
अर्जेंटिनाला पराभूत केल्याने ‘राजा’ भलताच खूष! सौदी अरेबियाच्या प्रत्येक खेळाडूला रोल्स रॉयस ‘गिफ्ट’