चिपळूण। ६७ व्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेच्या महिला विभागात मुंबई उपनगर, पुणे, मुंबई शहर व ठाणे तर पुरुष गटात रत्नागिरी, मुंबई शहर, सांगली व रायगड उपांत्य फेरीत दाखल झाले.
महिला विभागात पुणे संघाने कोल्हापूरवर ४७-२२ असा एकतर्फी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर यजमान रत्नागिरी संघाला मुंबई उपनगर कडून ३८-१३ असे पराभवाला समोरे जावे लागले. सायली जाधव, कोमल देवकर यांनी उत्कृष्ट खेळ केला.
मुंबई शहरने ३२-१२ असा औरंगाबाद संघाचा धुव्वा उडवला. मुंबई कडून चढाईत पूजा यादव, मेघा कदम यांनी जबरदस्त खेळ केला. ठाणे विरुद्ध सातारा यांच्यातील लढत चांगली झाली. ठाणे संघाने ४२-३२ अशी बाजी मारली. ठाणे कडून निकिता कदम, अर्चना करडे यांनी चांगला खेळ केला. सातारा कडुन सोनाली हेलवीने एकाकी झुंज दिली.
तर पुरुष गटात रायगड विरुद्ध मुंबई उपनगर यांच्यात अटीतटीची लढत झाली. मध्यंतरापर्यत १३-११ अशी मुंबई उपनगर कडे आघाडी होती. शेवटचा मिनिट शिल्लक असतात २२-१९ आघाडी उपनगर संघाकडे होती. मात्र रायगडच्या बिपिन थलेच्या सुपररेड ने सामन्याला कलाटणी दिली. २६-२३ असा विजय मिळवत गटविजेता रायगड संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला.
यजमान रत्नागिरी संघाने ३९-१६ कोल्हापूर संघाचा धुव्वा उडवला. रत्नागिरी कडून चढाईत अजिंक्य अशोक पवार, रोहन गंभरेने उत्कृष्ट केला. पकडीत स्वप्नील शिंदे, अजिंक्य सुनील पवार, शुभम शिंदेने चांगला खेळ केला. मध्यंतरापर्यत १६-१० अशी आघाडी पुणे कडे असताना सांगली संघाने सामना फिरवत ३६-२८ असा विजय मिळवला. राहुल वडार, योगेश भिसे यांनी उत्कृष्ट खेळ केला. तर मुंबई शहरने ५१-२९ असा ठाणे संघावर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुंबई कडून पंकज मोहिते, सुशांत साहिल यांनी जबरदस्त खेळ केला.
उपांत्य फेरी सामने (महिला)
१) मुंबई उपनगर विरुद्ध पुणे
२) मुंबई शहर विरुद्ध ठाणे
उपांत्यफेरी सामने (पुरुष)
१) रत्नागिरी विरुद्ध रायगड
२) मुंबई शहर विरुद्ध सांगली
गतविजेता रायगड, पुणेसह यजमान रत्नागिरीच्या संघांचा बादफेरीत प्रवेश
वाचा👉https://t.co/MscIzvxACl👈#म #मराठी #Kabaddi @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT— Maha Sports (@Maha_Sports) December 21, 2019
वाढते वय ही समस्या नाही, केकेआरने काहीतरी पाहिले म्हणूनच मला खरेदी केले – प्रविण तांबे
वाचा- 👉https://t.co/iZvvfkM82R👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi@MarathiRT #IPL2020Auction
— Maha Sports (@Maha_Sports) December 22, 2019