ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (AUSvSA) यांच्यात मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना सुरू आहे. हा सामना 4 जानेवारीपासून सिडनीमध्ये खेळला जात आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात उस्मान ख्वाजा आणि स्टीव्ह स्मिथ यांनी शतकी खेळी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. स्मिथने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 30वे शतक करताना सर डॉन ब्रॅडमन यांना तर मागे टाकलेच, तर सचिन तेंडुलकरचा विक्रम थोडक्यात वाचला.
स्मिथने शतक करताच तो कसोटीमध्ये 30 किंवा त्याच्यापेक्षा अधिक शतके करणारा 14वा फलंदाज ठरला. त्याला 30 शतके करण्यासाठी 162 डाव खेळावे लागले. असे करताना त्याने रिकी पॉंटिंग, सुनील गावसकर आणि मॅथ्यू हेडन यांना मागे टाकले, मात्र त्याला सचिनला मागे टाकण्यात अपयश आले. सचिनने 159व्या डावातच कसोटीतील तिसावे शतक झळकावले होते. यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 30 शतके करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर अबाधित आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 30 शतके करण्याच्या यादीत स्मिथ दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर हेडनचा क्रमांक लागतो. त्याने 167 डावांमध्ये, पॉंटिंगने 170 आणि गावसकर यांनी 174 डावांमध्ये कसोटीतील तिसावे शतक केले होते.
सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या फलंदाजंपैकी स्मिथ सर्वाधिक कसोटी शतके करणारा आहे. यादीत दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट आहे, ज्याने 28 शतके केले आहेत. विराट या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने आतापर्यंत 27 शतके केली आहेत.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून ऑस्ट्रेलियाने 4 विकेट्स गमावत 475 धावा केल्या आहेत. स्मिथ 104 धावा करत बाद झाला. यामुळे ख्वाजा 195 धावा आणि मॅट रेनशॉ 5 धावा करत खेळपट्टीवर उपस्थित आहेत. तत्पूर्वी मार्नस लॅब्यूशेन 79 आणि ट्रेविस हेड 70 धावा करत बाद झाले.
या मालिकेतील पहिले दोन्ही सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले असून यजमानांचा आता दक्षिण आफ्रिकेला व्हाईट वॉश देण्याचा प्रयत्न असणार आहे. (Steve Smith could not Break Sachin Tendulkar world record Fastest 30 centuries in Tests)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पीवायसी फिल्ट्रम चॅलेंजर क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात हिंदू जिमखाना, डीव्हीसीए संघांचे वर्चस्व
आजच्याच दिवशी 15 वर्षीय मुंबईकराने घातलेला धावांचा रतीब, एकाच डावा चोपलेल्या नाबाद 1009 धावा