भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 5 सामन्यांच्या बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) स्पर्धेला (22 नोव्हेंबर) पासून सुरूवात होणार आहे. दोन्ही संघ पहिल्या सामन्यासाठी पर्थच्या मैदानावर भिडणार आहेत. पण बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) मोठे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला, घरच्या मैदानावर कसोटी सामन्यांमध्ये फलंदाजी करणे आता अधिक आव्हानात्मक.
सिडनी मॉर्निंग हेराल्डशी बोलताना स्मिथ म्हणाला, “त्यावेळेस खेळपट्ट्या कदाचित चांगल्या होत्या, त्यामुळे तुम्हाला बाद करण्यासाठी चांगले चेंडू कमी होते. यात बरीच चूक फलंदाजांची होती आणि त्यावेळी मला वाटले की, मी जास्त चुका करत नाहीये. मला वाटते की, मी पहिल्या कसोटीपूर्वी सांगितले होते, ते मला बाद करू शकणार नाहीत आणि ते खरे ठरले. कदाचित मला हे पुन्हा पुन्हा सांगावे लागेल की, या खेळपट्टीवर टिकून राहण्यासाठी प्रयत्न करावा लागेल.”
पुढे बोलताना स्मिथ म्हणाला, “2000 आणि 2018 च्या सुरुवातीच्या काळात खेळपट्ट्या खूप चांगल्या होत्या. ऑस्ट्रेलियात ते गोलंदाजांपेक्षा फलंदाजांना अनुकूल होते आणि आता ते उलटे झाले आहे. त्यामुळे घरच्या मैदानावर फलंदाजी करणे खूप कठीण असणार आहे.
बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीसाठी ऑस्ट्रेलिया संघ-पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नाथन लायन, मिचेल मार्श, नॅथन मॅकस्वीनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर
बॉर्डर गावसकर मालिकेचे पूर्ण वेळापत्रक
पहिली कसोटी: 22-26 नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी: 6-10 डिसेंबर, ॲडलेड (दिवस-रात्र कसोटी)
तिसरी कसोटी: 14-18 डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथी कसोटी: 26-30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी: 3-7 जानेवारी, सिडनी
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS; हर्षित राणा की प्रसिद्ध कृष्णा? पहिल्या सामन्यासाठी कोणाला मिळणार संधी?
IPL Mega Auction; ‘हे’ 3 संघ मेगा लिलावात डेव्हिड मिलरला करणार टार्गेट?
जेसन गिलेस्पीची होणार सुट्टी? पाकिस्तानला मिळणार नवा मुख्य प्रशिक्षक