येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेचे आयोजन युएई आणि ओमानमध्ये केले जाणार आहे. या स्पर्धेच्या पार्शवभूमीवर ऑस्ट्रेलिया संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेला आहे. त्यांना तिथे वेस्ट इंडिज संघाविरुद्ध ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. मात्र टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यांचा मुख्य फलंदाज स्टीव्ह स्मिथ या चषकातून फिटनेसमुळे आणि ॲशेस सिरीजच्या पुर्वतयारीसाठी माघार घेऊ शकतो. परंतु या संघात असा एक खेळाडू आहे, जो टी-२० विश्वचषक स्पर्धेत स्मिथची जागा घेऊ शकतो.
स्मिथ हा ऑस्ट्रेलियन संघाचा मुख्य फलंदाज आहे. त्यामुळे तो जर टी-२० विश्वचषक स्पर्धेत नसेल तर, ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसू शकतो. परंतु या संघात स्मिथची उणीव भरून काढण्यासाठी एक फलंदाज आहे, ज्याचे नाव मार्नस लाबूशेन आहे. मार्नस लाबूशेनला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संधी देण्यात आली नाही. परंतु त्याने खेळलेल्या २२ ट्वेंटी ट्वेंटी सामन्यात २९.८ च्या सरासरीने ५६७ धावा केल्या आहेत. (Steve Smith potential absence open door of marnus labuschagne in icc T20 world cup)
टी-२० ब्लास्ट स्पर्धेत केली तुफान फटकेबाजी
मार्नस लाबूशेनने इंग्लंडच्या टी-२० ब्लास्ट स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने या हंगामातील ६ डावांमध्ये ५९ च्या सरासरीने २९४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १३७ चा होता. त्याची खेळण्याची पद्धत ही स्मिथ सारखीच आहे. सुरुवातीला तो संथपणे खेळतो. परंतु एकदा मैदानावर पाय जमल्यानंतर तो देखील मोठे फटके खेळतो. त्यामुळे त्याला स्मिथची सावली देखील म्हटले जाते.
विलगीकरणाला वैतागून त्याने वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणे टाळले होते. टी-२०विश्वचषक स्पर्धेबाबत बोलताना तो म्हणाला की, “सतत टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या गोष्टी सुरु आहेत. माझे काम फक्त धावा बनवण्याचे आहे. ऑस्ट्रेलियन संघ मध्यक्रमातील फलंदाजाच्या शोधात आहे. ही माझ्यासाठी चांगली संधी आहे.”
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानची पुन्हा फजिती, ‘या’ कारणामुळे वेगवान गोलंदाजाची इंग्लंडहून झाली हकालपट्टी
टीम धवनशी भिडणार श्रीलंकेचा नवा संघनायक, मागील ४ वर्षांत बदललेत चक्क ‘इतके’ कर्णधार
ऑटोग्राफ मागायला आलेल्या मुलीवरच झाले गावसकरांना प्रेम, वाचा त्यांची प्रेमकहाणी