भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यानच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्याला ७ जानेवारीपासून सिडनीच्या मैदानावर सुरुवात झाली. या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव स्मिथने शानदार शतकी खेळी केली. जवळपास दीड वर्ष कसोटी क्रिकेट मध्ये शतक न करणाऱ्या स्मिथवर सामन्यापूर्वी अनेक क्रिकेट पंडित टीका करत होते.
विशेषतः तो भारताचा ऑफस्पिनर आर अश्विनच्या गोलंदाजीवर सतत बाद होत असल्याने त्याच्या उणीवा उघड्या पडल्याची चर्चा होत होती. मात्र या सामन्यातील शतकी खेळीने स्मिथने टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर स्मिथने या टीकेबाबत आपले मत प्रदर्शित केले. टीकाकारांबद्दल बोलताना स्मिथ म्हणाला, “मी बरेच काही वाचत होतो. फॉर्ममध्ये नसणे आणि धावा निघत नसणे यात फरक आहे. आज शतक करणे विशेष होते कारण त्यामुळे अनेकांची तोंड बंद होतील.”
मालिकेत विशेष कामगिरी न करू शकलेल्या स्मिथने अखेर आपल्या घरच्या मैदानावर उत्तम फलंदाजी केली . स्मिथने 226 चेंडूचा सामना करताना 131 धावांची उत्तम खेळी केली. स्मिथने या खेळीदरम्यान 16 चौकार देखील लगावले होते. दरम्यान सामन्याचा विचार केला असता ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 338 धावांवर आटोपला.दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताने 2 गडी गमावत 96 धावा केलेल्या आहेत.चेतेश्वर पुजारा 9 व कर्णधार अजिंक्य 5 धावांवर नाबाद होते.
महत्वाच्या बातम्या:
पुजाराची संथ फलंदाजी आणि प्रेक्षकाने भर मैदानातच घेतली डुलकी!
ऑलिंपिकमध्ये व्हावा टी-१० क्रिकेटचा समावेश, स्फोटक फलंदाज ख्रिस गेलची मागणी
आयडियाची कल्पना! लॅब्यूशानेने बॅटची ग्रीप बसवताना हँडेलवर फुंकर घातल्याचं हे होतं कारण