इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात २ जूनपासून २ सामन्यांची कसोटी मालिका सुरु झाली आहे. या मालिकेसाठी इंग्लंड संघाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या मालिकेसाठी त्यांनी त्यांच्या संघाचे उपकर्णधारपद दिग्गज गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडकडे सोपवले आहे.
संघाचा नियमित उपकर्णधार बेन स्टोक्स दुखापतग्रस्त असल्याने ही जबाबदारी ब्रॉडवर सोपवण्यात आली आहे. स्टोक्स आयपीएल २०२१ दरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या बोटांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे आता ब्रॉड न्यूझीलंडविरुद्ध संघातील अनुभवी गोलंदाज म्हणूनच नाही तर उपकर्णधार म्हणूनही जबाबदारी सांभाळेल. कसोटी क्रिकेटमध्ये ब्रॉडला पहिल्यांदाच इतकी मोठी जबाबदारी मिळाली आहे. त्याने यापूर्वी 3 वनडे आणि 27 टी20 सामन्यात इंग्लंड संघाचे नेतृत्व केले आहे.
ब्रॉड इंग्लंडच्या सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने 2006 मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने 146 कसोटीमध्ये 517 बळी घेतल्या आहेत. 18 वेळा त्याने एका डावात 5 बळी तर 2 वेळा सामन्यात 10 बळी घेण्याचा विक्रम नोंदवला आहे. त्याने 121 एकदिवसीय सामन्यात 178 बळी घेतल्या. तर 56 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात त्याने 65 बळी घेतल्या. परंतु त्याने 2016 नंतर एकदिवसीय आणि टी20 सामन्यात तो खेळा नाही. तो सध्या कसोटीमध्ये नियमित खेळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बॅटिंगपेक्षा ती जास्त आवडते का? राशिदने टाकली ‘या’ भारतीय फलंदाजाला गुगली
लॉर्डस कसोटीत इंग्लंडने परिधान केली काळी जर्सी, कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक