आयपीएल 2025 स्पर्धेतील 33 वा सामना आज म्हणजेच 17 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात खेळला जात आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, तसेच हैदराबादला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. हैदराबादने प्रथम फलंदाजी करून 162 धावा केल्या आहेत तसेच आता मुंबईला जिंकण्यासाठी 163 धावांचं आव्हान दिलेलं आहे.
सनरायझर्स हैदराबादने 20 षटकार पाच खेळाडू गमावून 162 धावा केल्या आहेत. हैदराबादसाठी खेळताना 23 हेड आणि अभिषेक शर्माने आज खूप हळू गतीने सुरुवात केली. अभिषेक शर्माने 28 चेंडूत 40 धावा केल्या त्या दरम्यान त्याने 7 चौकार झळकावले. तसेच ट्रेविस हेडने 29 चेंडूत 28 धावांची पारी खेळली. याचबरोबर हेनरिक क्लासेनने 28 चेंडूत 37 धावा केल्या. तसेच ईशान किशन अवघ्या दोन धावांवर बाद झाला.
मुंबईसाठी गोलंदाजी करताना विल जॅक्सने 2 विकेट्स घेतल्या. तसेच हार्दिक पांड्या, बोल्ट आणि बुमराहने एक- एक विकेट घेतली. हा सामना मुंबईच्या घरच्या मैदानावर खेळला जात आहे. त्यामुळे चाहत्यांना नक्कीच मुंबईच्या विजयाची अपेक्षा असेल, याचबरोबर चाहत्यांना रोहित शर्माकडून सुद्धा चांगल्या पारीची अपेक्षा असेल. मुंबई हे आव्हान किती षटकात पूर्ण करेल हे पाहणं रंजकतेचे असणार आहे.