पुणे । सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची बहुचर्चित निवडणूक पुढे ढकलली आहे. ही निवडणुक २ मे रोजी अर्थात आज होणार होती.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनबरोबरच आता कोणत्याच राज्य संघटनेची निवडणूक ११ मे पर्यंत होणार नाही.
सरन्यायाधीश दिपक मिश्रा, न्यायाधीश एएम खानविलकर आणि न्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे की जोपर्यंत भारतीय क्रिकेट बोर्डाकडून नविन नियमावली आणि अंतिम मसूद्याला मंजुरी मिळत नाही तोपर्यंत कोणतीही निवडणूक होणार नाही.
तसेच यापुर्वीच बीसीसीआयच्या प्रशासकांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या चिटणीसांना निवडणुका घेणे नियमबाह्य असल्याचे कळवले होते.
यावेळी महाराष्ट्राबरोबर अन्य एका संघटनेवर प्रशासक नेमण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात केली होती.
लोढा समितीने सुचवलेल्या सुचनांची अंमलबजावणी न करताच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची यावर्षीची निवडणुक होणार होती.
महत्त्वाच्या बातम्या –
–आयपीएलच्या ट्राॅफीवर संस्कृत भाषेत नक्की काय लिहीले आहे?
–Video- चक्क स्टेडियमच्या बाजूला क्रेन उभे करून त्या फूटबाॅल वेड्याने घेतला सामन्याचा आनंद
–अबब! विंबल्डनच्या बक्षिसांची रक्कम २०१८मध्ये तब्बल ३०० कोटी
–पराभूत होऊनही मुंबईच्या हार्दिक पंड्या जिंकली सर्वांची मने