भारतीय संघाचा माजी खेळाडू सुरेश रैना आयपीएलचा तेरावा हंगाम खेळण्यासाठी यूएईत गेला होता. मात्र ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच सुरेश रैनाने आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली होती. त्यावेळी या मुद्द्यावर खूप चर्चा झाली होती. त्याचबरोबर त्याच्या माघारी येण्याच्या निर्णयावर विविध अंदाज वर्तविण्यात आले होते. यादरम्यान रैना आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी यांचे संबंधही बिघडले असल्याचे म्हटले जात होते.
सुरेश रैनाने 15 ऑगस्ट 2020 रोजी धोनी पाठोपाठ निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर दोघे आयपीएलचा तेरावा हंगाम खेळण्यासाठी यूएईत गेले होते. तिथे रैना चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करणार होता. मात्र रैनाने या स्पर्धेच्या अगोदर अचानक माघार घेतली. त्यामुळे विविध अंदाज वर्तविण्यात आले होते. त्यावेळी चेन्नई संघाचे मालक एन श्रीनिवासन हे म्हणाले होते की, सुरेश रैना धोनी सारखी रुम मिळाली नाही म्हणून नाराज होता.
तो माघारी आल्यानंतर धोनी आणि रैना यांच्यात वाद झाल्याची तर्क लावले जात होते. काही माध्यमांच्या माहितीनुसार धोनीने रैना सोबत चर्चा केली होती. रैनाला शांत करण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. मात्र त्यानंतर ही रैनाने आपला निर्णय बदलला नाही.
सुरेश रैना धोनीबद्दल बोलताना टाइम्स ऑफ इंडियाला म्हणाला, “धोनी सोबतची माझी मैत्री एक वेगळ्या प्रकारची आहे. आम्ही सोबतच भारत आणि चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी खूप सामने जिंकले आहेत. आम्ही लवकरच भेटू आणि योजना बनवू. आमची भागीदारी पुन्हा सुरू होईल. सर्व गोष्टी बरोबर होतील आणि मला आशा आहे की सर्व योजनेनुसार होईल.”
धोनी आणि रैनाची मैत्री खूप मजबूत आहे
धोनी आणि रैनाची मैत्री कोणापासून ही लपून राहिलेली नाही. रैनाच्या मनात धोनीबद्द्ल प्रेम आणि आदर आहे. याचा प्रत्यय तर गेल्यावर्षी 15 ऑगस्ट 2020 रोजी आला. जेव्हा धोनीने निवृत्ती स्विकारली, तेव्हा रैनाने सुद्धा लगेचच काही वेळात निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे आता दोघेही आंतरराष्ट्रीय सामने खेळत नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
नव्या वर्षाचा नवा जोश! सिडनी कसोटीपुर्वी टीम इंडियाचा कसून सराव, पाहा व्हिडिओ
जोर का झटका.! चाहत्याशी जवळीक भारतीय खेळाडूंना भोवली, रोहितसह ‘हे’ ५ जण पुन्हा आयसोलेशनमध्ये