भारतीय संघाचा माजी डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती 15 ऑगस्ट 2020 रोजी आपली निवृत्ती जाहीर केली होती. त्यांनंतर तो आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर संघाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी यूएईसाठी रवाना झाला होता. मात्र अचानक तो आयपीएलमधून माघात घेत स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदरच भारतात परतला होता. या प्रकरणाबद्दल त्याने आता भाष्य केले आहे.
आयपीएल स्पर्धा सुरू होण्याच्या काही दिवस अगोदरच रैनाने माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तो भारतात आला होता. रैनाच्या या निर्णयामुळे त्याला अनेकांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. त्याचबरोबर त्याच्या या निर्णयावर सीएसकेचे संघमालक एन श्रीनिवासन खूप नाराज झाले होते. तसेच रैनाच्या या निर्णयावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते.
सुरेश रैनाने केला खुलासा
सुरेश रैनाने आयपीएलच्या तेराव्या हंगामातून अचानक माघार घेण्याबद्दल टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, ‘तेराव्या हंगामातून माघार घेतल्याने मला कोणताही पश्चाताप झालेला नाही. त्यावेळी माझ्या कुटुंबाला माझी गरज होती म्हणून मी माघार घेतली.’
तत्पूर्वी असे म्हटले जात होते की, रैनाला युएईमध्ये गेल्यानंतर हॉटेलमधे बाल्कनी असलेली रूम दिली नव्हती. त्यामुळे तो नाराज झाला होता.
मला पश्चाताप का होईल : सुरेश रैना
सुरेश म्हणाला, “मला पश्चाताप का होईल. मी माझ्या मुलांसोबत आणि परिवारा सोबत वेळ घालवला आहे. मला खरचं कुटुंबासाठी माघारी यायचे होते. पंजाबमध्ये माझ्या कुटुंबासोबत खूप दुर्दैवी घटना घडली होती. त्यांना माझी गरज होती. (पठाणकोट मध्ये लूटमारीच्या दरम्यान त्याच्या मामाची आणि आते भावाची हत्या करण्यात आली होती.) त्याचबरोबर कोरोनाच्या काळात पत्नीला माझी गरज होती.”
त्याचबरोबर रैना म्हणाला, “मी मागील 20 वर्षापासून खेळत आहे. यामुळे मला माहिती आहे, मी पुनरागमन करू शकतो. परंतु, जेव्हा आपल्या कुटुंबाला आपली गरज असेल. आपल्याला तिथे हजर रहावे लागेल. त्यामुळे माझा हा निर्णय समजदारीचा होता.”
महत्त्वाच्या बातम्या –
अरर..!! चाहत्याने भरलेलं ‘ते’ बिल भारतीय क्रिकेटर्सच्या आलं अंगलट; पंतच्या चूकीचा होणार तपास
लॅब्यूशानेने घेतला भारतीय गोलंदाजांचा धसका, ऑस्ट्रेलियन फलंदाजांना सावध राहण्याचा केला इशारा
‘तो’ क्रिकेटर म्हणजे भारताचा भविष्यातील स्टार गोलंदाज, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सांगितले नाव